आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:केंद्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम राज्यात लागू करणार का? ; शिक्षकाचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील पालकही विद्यार्थ्यांना केंद्रीय शाळांमध्ये घालण्याचा ओढा वाढत आहे. परंतु सगळ्याच पालकांना पैसे देऊन शिक्षण घेता येत नाही. वन नेशन, वन एज्युकेशननुसार सर्व शाळांमध्ये केंद्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम चालू केल्यास फायदा होणार आहे. यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकाने जिल्हा परिषद शाळांसह राज्यात एनसीईआरटीचा अभ्यासक्रम लावण्यात येणार का? असा सवाल केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शिक्षकांना दिला.

शिक्षण दिनानिमित्त राज्यस्तरावरील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा संवाद साधला. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्रित बोलावले होते. मुख्यमंत्री यांनी शिंदे वर्षा शासकीय निवासस्थानातून दृकश्राव्य प्रणालीद्वारे हा संवाद साधला. येवले यांनी, वन नेशन, वन एज्युकेशन नुसार एनसीईआरटी अभ्यासक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवाल का? असा प्रश्न विचारला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपसंचालक औदुंबर उकिरंडे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, अशोक भांजे आदींसह उपक्रमशील शिक्षकांना बोलवण्यात आले होते.

नवी दिशा व संवाद : केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करण्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध मुद्दे आणि नवी दिशा यांचा या संवादादरम्यान ऊहापोह करण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांनी प्रश्न विचारल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक डॉ. नागनाथ येवले यांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

बातम्या आणखी आहेत...