आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:सभासदांच्या आर्थिक मदतीने आदिनाथ चे धुराडे पेटेल

वाशिंबे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी प्रत्येक सभासदाने पाच ते दहा हजार रुपयांची मदत करावी. तरच कारखाना चालू होईल, अन्यथा कारखाना चालू होणे शक्य नाही, असे मत आदिनाथ बचाव समितीचे सदस्य हरिदास डांगे यांनी कारखाना स्थळावर आयोजित बैठकीत व्यक्त केले. या वेळी बोलताना डांगे म्हणाले, साखर कारखान्यातील माझ्या अनुभवाचा फायदा आदिनाथ कारखाना चालू करण्यासाठी होईल, या उद्देशाने तालुक्यातील मंडळींच्या आग्रहाखातर मी सहभागी झालो आहे.

आता ७० टक्के काम झाले आहे. ३० टक्के कामासाठी पैशांची गरज आहे. आपण सहकार्य केले तर कारखाना चालू होईल. मी स्वत: पाच लाख दिले आहेत. मी कारखान्यासाठी आणखी पाच लाख देईन. आदिनाथ कारखाना चालू करण्यासाठी प्रा. तानाजी सावंत यांनी नऊ कोटी रुपये दिले आहेत. चार ते पाच कोटी रुपयांची आवश्यकता आहे. येत्या आठ दिवसात रक्कम जमा होईल. कारखाना नक्की चालू होईल.

बातम्या आणखी आहेत...