आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सफाईकामाच्या खोटेपणाची साक्ष:सफाईच्या खोटेपणाचे साक्षीदार उगवले; दुभाजकालगत साचलेल्या मातीत गवत

चंद्रकांत मिराखोर | सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख रस्ते झाडण्यासाठी खासगी कंपनीला मक्ता दिला. परंतु सफाई प्रामाणिकपणे होत नसल्याने दुभाजकालगत आणि रस्त्याकडेला माती तशीच साचून आहे. आता पावसाच्या पाण्याने त्यात गवतही उगवत आहे. ते सफाईकामाच्या खोटेपणाची साक्ष देत आहे.

एकूण ४१ रस्ते सफाईसाठी महापालिका रोज सुमारे १३ लाख रुपये मोजत आहे. तरीही धूळ-मातीपासून सोलापूरकरांना मुक्ती मिळालेली नाही. पावसामुळे माती साचलेल्या रस्त्यावर राडा होत आहे. पाऊस थांबल्यानंतर कोरड्या रस्त्यांवर वाहनांच्या ये-जा मुळे प्रचंड धूळ उडत आहे. रस्ते सफाई होत असेल तर गवत उगवते कसे? धूळ उडते कशी? असे प्रश्न निर्माण होत आहेत. याबाबत महापालिका अधिकारी गंभीर नाहीत. ‘अचानक पाहणी करतो’, असे सांगणारे महापालिका अधिकारी कार्यालयाबाहेर पडून प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यास तयार नाहीत. घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाकडून आलेल्या ११५ कोटी रुपये खर्च करण्यासाठी महापालिकेने धूळमुक्त शहर अंतर्गत शहरातील १२० किलो मीटर रस्ते रोज आणि एक दिवसाआड झाडण्यासाठी पाच वर्षांचा मक्ता दिला.

धूळमुक्त हवेत निरोगी श्वास घेण्याचा हक्क सोलापूरकरांना कधी मिळेल?
उदाहरण : सैफुल मार्गावर सफाई नाही
सात रस्ता ते सैफुल हा ३.८० किमी रस्ता असून, रस्ता दुभाजक आणि फुटपाथ बाजू अशा चार बाजूंनी रस्ता झाडण्याचा मक्ता दिला. त्यानुसार काम करणे अपेक्षित आहे. जो रस्ता झाडला असे दाखवला जाते त्या ठिकाणी माती साचून गवत उगवल्याचे दिसून येते. रस्ता दुभाजकाच्या दोन आणि फुटपाथच्या दोन बाजू, अशा चार बाजू झाडाव्यात असे कामाच्या यादीत नमूद आहे. फुटपाथच्या बाजूस दलदल झाले आहे.

रोज सफाईच्या रस्त्यांची संख्या १४

एकूण रस्ता १८० किमी रोज झाडणे १२० किमी प्रती किमी दर ११५६ रु. एकूण रस्ते ४१ रोज झाडणे १४ दिवसाआड झाडणे २७

पाहणी करण्यात येईल
शहरात मक्तेदाराकडून रस्ते सफाई काम सुरळीत आणि योग्य पध्दतीने होत नसेल तर आरोग्य निरीक्षकांस सूचना देऊन काम सुरळीत होईल यांची दक्षता घेऊ. मक्तेदारांना सूचना देऊ. भेट देऊन सफाई कामाची पाहणी करू.
मच्छिंद्र घोलप, उपायुक्त, घनकचरा विभाग, महापालिका

बातम्या आणखी आहेत...