आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राण्यांमधील विषाणू:लांडग्यांना कॅनाईल डिस्टेम्पर,कुत्र्यांवर लक्ष ठेवण्याची गरज

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याच्या सीमेवरील दौंड, इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्रातील दुर्मिळ लांडगा प्राण्यांमध्ये कॅनाईन डिस्टेम्पर या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले.

त्या विषाणूमुळे काही महिन्यांपूर्वी चार लांडग्यांचा मृत्यू झाला होता. पाळीव अथवा भटका कुत्रा त्या बाधित प्राण्यांच्या संपर्कात आल्याने विषाणूचा प्रसार अधिक झपाट्याने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्याच्या सीमेवरील भागामध्ये तो प्रकार झाल्याने पशुसंवर्धन विभागातर्फे पाळीव, भटक्या कुत्र्यांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. लांडगा, खोकड हे श्वान कुळातील प्राणी आहेत. करमाळा, सांगोला तालुक्यात लांडग्यांचा वावर जास्त आढळतो. वनविभागाने त्यांच्या हद्दीतील लांडगा, खोकड प्राण्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

याविषयी प्रादेशिक वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी यांना विचारले असता, दौंड परिसरात चार लांडग्यांना कॅनाईन डिस्टेम्परची लागण झाल्याचे आढळले होते. त्यासंदर्भात पुण्यातील रेस्क्यू टिम उपचारासाठी आली होती. लसीकरणाची सूचना त्यांनी केली होती. त्यानंतर पुन्हा कुठेही लांडगा अथवा त्यांच्या संपर्कात आलेल्या पाळीव प्राण्यांमध्येही वेगळी कोणती लक्षणं आढळली नाहीत, असे त्यांनी सांगितले.

माणसांना धोका नाही
कॅनाईन डिस्टेम्पर हा आजार झाल्यास लांडग्यांच्या नाक, तोंडातून लाळ येते. श्वसनावर प्रभाव पडत असल्याने त्यांना व्यवस्थित चालता येत नाही. रक्ताची तपासणी केल्यानंतर हा विषाणू असल्याचे समजते. हा विषाणू फक्त श्वान कुळातील प्राण्यांना होतो. माणसांना त्यापासून कोणताही धोका नाही. लांडगा, खोकड या जंगली प्राण्यांवर उपचार करणे फार आव्हानात्मक आहे. पाळीव कुत्र्यांवर उपचार होऊ शकतात.’ डॉ. सत्यजित पाटील, पशुवैद्यक तज्ञ, सोलापूर
परिसरात चार लांडग्यांना कॅनाईन डिस्टेम्परची लागण झाल्याचे आढळले होते. त्यासंदर्भात पुण्यातील रेस्क्यू टिम उपचारासाठी आली होती. लसीकरणाची सूचना त्यांनी केली होती. त्यानंतर पुन्हा कुठेही लांडगा अथवा त्यांच्या संपर्कात आलेल्या पाळीव प्राण्यांमध्येही वेगळी कोणती लक्षणं आढळली नाहीत, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...