आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:महिलेची गळफास घेत आत्महत्या, हैदराबादच्या बिल्डरवर गुन्हा‎; जागेची किंमत न दिल्याने केली आत्महत्या‎

सोलापूर‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागेच्या व्यवहारातील रक्कम पूर्ण न देता, न वटणारे चेक‎ दिले. वारंवार त्रास देत जागा नावावर कर म्हणत‎ महिलेचा छळ केल्याने महिलेने माहेरी सोलापुरात येऊन‎ गळफास घेऊन आत्महत्या केली. अर्चना ज्ञानेश्वर कोटा‎ ( वय ३८, रा. हैदराबाद, तेलंगणा) असे महिलेचे नाव‎ आहे.

गळफास घेण्यापूर्वी त्यांनी सहा ते सात व्हिडिओ‎ तयार करून त्यात आपल्या मृत्यूस तेलंगणातील बिल्डर‎ कारणीभूत असल्याचे सांगितले हाेते. त्यावरून नागराज‎ यादव ( रा. हैदराबाद) यांच्यावर गुन्हा दाखल झाला‎ आहे.‎ याप्रकरणी अर्चना यांची बहीण सुरेखा गोपीचंद सरवदे‎ ( वय ३३, रा. नीलम नगर, आकाशवाणी केंद्र) यांनी‎ एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.‎

फिर्यादी सुरेखा यांची बहीण मृत अर्चना या हैदराबादमध्ये‎ राहण्यास होत्या. त्यांना त्यांच्या सासऱ्याने चारमिनार‎ परिसरातील मोक्याच्या ठिकाणातील तीन हजार स्केवर‎ फूट जागा बक्षीस स्वरूपात दिली होती. यातील एक‎ हजार स्क्वेअर फूट जागा त्यांनी आरोपी यादव यांना‎ विकली होती. दुसऱ्या व्यवहारात आरोपीने ४० लाख‎ व्यवहारातील रक्कम पूर्ण न देता न वटणारे चेक दिले.‎

त्यानंतर अर्चना यांच्या पतीचे निधन झाले. दरम्यान,‎ अर्चना या आरोपीच्या जागेमध्ये भाड्याने राहण्यास‎ गेल्यानंतर आरोपीने त्यांना नळाने पिण्याचे पाणी न देता‎ त्यांना त्रास दिला. ही बाब त्यांनी फिर्यादींना फोनमधून‎ सांगितली होती. दरम्यान, १ मे रोजी त्यांनी आईकडे येऊन‎ त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.‎