आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक घटना:मळणी यंत्रात केस अडकल्याने डोक्याचा चेंदामेंदा, महिला मजुराचा जागीच मृत्यू

माढा7 महिन्यांपूर्वीलेखक: संदीप शिंदे
  • कॉपी लिंक

सोयाबीनची काढणी सुरु असताना मळणी यंत्रात केस आणि पदर अडकल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन महिला मजुरीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी गावात घडली आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विमल विलास आतकरे (वय-४८)असे त्या मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील विष्णु दळवी यांच्या शेतात बाबासाहेब उदंगेचे मळणी यंत्र सोयाबीन काढण्यासाठी आले होते. मजुरी काम करण्यास आलेल्या आतकरे या सोयाबीन टाकण्याचे काम करत असताना त्यांचे केस व साडीचा पदर मशिनच्या शॅफ्टमध्ये अडकला. मशिनमध्ये आतकरे खेचल्या गेल्या आणि क्षणार्धात व्हत्याचे नव्हते झाले. यात डोक्याचा चेंदा मेंदा होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...