आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक महिला दिन:महिलांनी सक्षम बनून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करावे

उस्मानाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. दीपा सावळे यांचे आवाहन, उस्मानाबादसह परंडा, निलेगाव, ईट, नळदुर्ग येथे कार्यक्रम

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रा. गे. शिंदे महाविद्यालय
महिलांनी सक्षम होऊन स्वतःच्या समस्या सोडवाव्यात व स्वत:चे अस्तित्व सिद्ध करावे, असे आवाहन प्राचार्या डॉ. दीपा सावळे यांनी रा. गे. शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त केले.प्रारंभी राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी डॉ. वैशाली थोरात, प्रा. अनिसा शेख, प्रा. डॉ. महेशकुमार माने, प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, डॉ. सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

उस्मानाबादेतील के. टी. कॉलेज येथे महिला दिन
उस्मानाबाद येथील के. टी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सावित्रीबाई फुले व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अस्मिता बुरगुटे, डॉ. सोनाली दीक्षित, प्रेमाताई सुधीर पाटील, डॉ. मंजुळा आदित्य पाटील, क्वालिटी अशुरन्स विभाग प्रमुख डॉ. अरुणादेवी बिराजदार व परीक्षा विभाग प्रमुख डॉ. शोभा टोले यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.सौ. प्रेमाताई सुधीर पाटील यांनी मुलींना स्वावलंबी बनण्याचे आवाहन केले.यानिमित्त गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, नाटकस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व फॅशन शो स्पर्धा घेण्यात आल्या.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अतुलकुमार अलकुंटे, उपकार्यक्रमअधिकारी प्रा. रुबिया काझी व प्रा. शिवरत्न खरे तसेच सर्वकर्मचारी व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त मंगळवारी (दि. ८) कंपनीच्या वतीने किल्ल्याचा कारभार महिलांच्या हाती देण्यात आला.

कंपनीच्या वतीने व्यवस्थापक जुबेर काझी व पीआरओ विनायक अहंकारी यांनी सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महिला दिनानिमित्त किल्ला पाहण्यास आलेल्या सर्व महिला पर्यटकांचे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच ६० वर्षे वयाच्या महिला पर्यटकांना किल्ल्यात मोफत प्रवेश देण्यात आला. यावेळी विलास येडगे, सुहास येडगे, शिवाजी नाईक, उत्तम बनजगोळे, सुनिल गव्हाणे, अजय चव्हाण, शोएब काझी व किल्ल्यातील कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. किल्ल्यात महिला दिन साजरा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक कफिल मौलवी व पीआरओ विनायक अहंकारी यांची संकल्पना होती. ज्येष्ठ शिक्षक परकाले सर व राजेंद्र सुतार सर यांनी महिलंच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद नांदे सर यांनी तर आभार शिवानंद धमे सर यांनी केले.

ईट जि. प. शाळा
महिला दिनानिमित्त ईट येथील आंतरराष्ट्रीय शाळा असलेल्या जिल्हा परिषद प्रशालेतील महिला शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. या वेळी शिक्षिकांचा शालेय समिती व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संगीता देशमुख, सत्यभामा आंबुसे, गिरजा गिरी, रूपाली गवळी, संगीता कुलकर्णी, सत्यभामा हुडकर्डे, प्रगती पवार, सुमन दाभाडे आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिजाऊ माँसाहेब, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, मदर तेरेसा, किरण बेदी आदींच्या वेशभूषा मुलींनी साकारल्या होत्या. मुख्याध्यापक पांडुरंग कवडे, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

बिल गेट्स महाविद्यालय
बिल गेट्स महाविद्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी महिलांच्या आजच्या परिस्थितीचे वर्णन करणारी एकांकिका सादर केली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दापके सर तसेच तेजल शहा उपस्थित होते. अध्यक्षीय भाषण करताना तेजल शहा यांनी आजची स्त्री पुरुषाबरोबर खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रांमध्ये आपली कामगिरी बजावत आहेत. असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा बेगमपूर व ऐश्वर्या क्षीरसागर यांनी केले. तर आभार प्रदर्शन गौरी चांडक यांनी केले.

निलेगाव जि. प. शाळा
निलेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमांसाठी शाळेतील विद्यार्थीनी कुमारी सुमती इंद्रजित भालेराव या मुलीची कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून निवड केली तर शाळेतील महिला शिक्षिका शुभदा कुलकर्णी या व शाळेतील खिचडी शिजवणाऱ्या ताई सौ. फरिनताई यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

त्यानंतर शाळेतील मुलींनी आपली मनोगत व्यक्त केले. तर कुमारी सुमती भालेराव हिने गीत गायन केले. त्यानंतर सौ. शुभदा कुलकर्णी यांनी महिला दिन का साजरा करतात याचे माहिती सांगितली. मुख्याध्यापक शिवाजीराव जाधव यांनी व प्रकाश जाधव सर व पवन सुर्यवंशी सर यांनी मार्गदर्शन केले.शाळेतील उपक्रमशील शिक्षक गुरुलिंग धावणे यांनी गीत गायन केले.

सौ. प्रेमाताई सुधीर पाटील यांनी मुलींना स्वावलंबी बनण्याचे आवाहन केले.यानिमित्त गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, नाटकस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व फॅशन शो स्पर्धा घेण्यात आल्या.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अतुलकुमार अलकुंटे, उपकार्यक्रमअधिकारी प्रा. रुबिया काझी व प्रा. शिवरत्न खरे तसेच सर्वकर्मचारी व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

सुनिता पावशेरे यांचा सत्कार
उस्मानाबाद येथील पुष्पक मंगल कार्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते कलदेव निंबाळ्याच्या सरपंच तथा राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्षा सुनीताताई पावशेरे यांचा गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,महिला बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे, नेहरु युवा केंद्राचे प्रमोद हिंगे, जिल्हा बँक व्यवस्थापक निलेश विजयकर, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, जिल्हा समन्वयक अधिकारी शोभा कुलकर्णी, माहिती प्रसार अधिकारी अंकुश चव्हाण, माविम जिल्हा व्यवस्थापक डॉ. बालवीर मु़ंडे, उस्मानाबाद सभापती हेमा चांदणे यावेळी उपस्थित होते.

महिला मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते झाले.जिल्हात विविध उपक्रम राबवणाऱ्या महिला सरपंच, महिला ग्रामसेवक यांचा या वेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महिला मेळाव्यात सत्कार झाला. सुनीता पावशेरे या जिल्ह्यातील एक उपक्रमशील महिला सरपंच ठरल्या आहेत. यापूर्वीही त्यांना जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायाधीश, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...