आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माता सुरक्षित तर, घर सुरक्षित' अभियान:राज्यात 3 कोटी महिलांची होणार आरोग्य तपासणी, नवरात्रोत्सवात आरोग्याचा जागर

सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुदृढ समाजासाठी महिलांचे आरोग्य हा अत्यंत महत्वाचा विषय आहे . कुटुंबाची काळजी घेणारी महिला कामकाज व्यापामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष्य देऊ शकत नाही . ती निरोगी राहावी , जागरूक व्हावी आणि समाजातही तिच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी, यासाठी नवरात्र उत्सवादरम्यान "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" हा आरोग्य तपासणी उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहे, अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.

3 कोटी माहिलांच्या आरोग्याची तपासणी

तानाजी सावंत यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने महिलांच्या आरोग्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांना लोकसहभाग मिळावा व मातृत्वाचा सन्मान व्हावा यासाठी नवरात्रोत्सव कालावधीत 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान' राबविण्यात येत आहे. या कालावधीत राज्यातील अठरा वर्षांवरील सुमारे तीन कोटी महिलांच्या आरोग्याच्या विविध तपासण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हा आरोग्य समितीच्या बैठकीत याबाबत नियोजन करण्यासाठीही सूचना दिल्या आहेत.

सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत शिबिर

जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी, आरोग्य सेवक, सेविका, आशा यांनाही आरोग्य मंत्री यांनी आव्हानपत्रे पाठविली आहेत. तसेच आरोग्य सेवा आयुक्त यांनी या मोहिमेबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक पत्र सर्व जिल्ह्यांना जारी केले आहेत. अभियानात सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत अठरा वर्षांवरील महिलांची तपासणी केली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज माता आणि महिलांच्या तपासणीची शिबिर घेण्यात येतील. उपकेंद्र आणि आरोग्य वर्धिनी केंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी मार्फत मातांची तपासणी, समुपदेशन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ग्रामीण रुग्णालय आणि त्यावरील रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ मार्फत तपासणी करण्यात येणार आहे. या कालावधीत मानवविकास कार्यक्रम अंतर्गत तज्ज्ञांची शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. विविध तपासणी होणार आहे

या तपासण्या होणार

या अभियानात महिलांच्या वजन, उंची, हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेचे प्रमाण याबाबतच्या चाचण्या घेण्यात येतील. आवश्यक वाटल्यास रक्ताच्या चाचण्या, छातीचे एक्सरे आणि इतर चाचण्या केल्या जाणार आहेत. कर्करोग, रक्तदाब, मधुमेह याबाबत चाचणी घेतली जाईल. माता आणि बालकांचे लसीकरण केले आहे का?, याचीही तपासणी केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...