आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटप्पा अनुदान वाटपाच्या प्रक्रियामुळे प्रभारी शिक्षणाधिकारी सुलभा वठारे वादाच्या भोवऱ्यात अडकल्या. आमदारांचे फोन व कार्यालयातील एका लिपिकाच्या पुढाकारामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तडकाफडकी अतिरिक्त पदभार काढून तो महिला व बालकल्याणचे अधिकारी जावीद शेख यांच्याकडे दिला आहे. वठारे यांनी नियमावर बोट ठेवून अनेक प्रस्तावांमध्ये त्रुटी काढल्या. त्याचा परिणाम भोगावा लागल्याची चर्चा आहे. दरम्यान, शेख यांच्यावर अपहाराचा ठपका आहे. शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची पुणे येथे बदली झाली आहे.
त्यानंतर अतिरिक्त पदभार वठारे यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर शासन स्तरावरून घोषित व अघोषित शाळांना टप्पा अनुदान घोषित करण्यात आले. त्याचे प्रस्ताव तपासणी अनुदान वाटप आदेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र वठारे यांनी प्रत्येक प्रस्तावाची पडताळणी करून अनुदान देण्याची प्रक्रिया पूर्ण केली. एक हजाराहून अधिक शिक्षकांच्या प्रस्तावामध्ये त्रुटी आढळून आल्या. या त्रुटी दुरुस्त करण्याच्या कामासाठी शुक्रवारी व शनिवारी माध्यमिक शिक्षण विभागात मोठी गर्दी होती. माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनीही भेट देऊन शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले. वठारे यांनी ‘नियमात आहे तेच करणार आहे’, असे सांगितले. शिक्षकांमध्ये त्यांच्याविषयी रोष निर्माण झाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.