आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजेंद्र माने हे सोलापूरचे नवे पोलिस आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत. बुधवारी गृह विभागाने त्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. माने हे सध्या राज्य गुप्तवार्ता मुंबई येथे उपमहानिरीक्षक या पदावर काम करत आहेत. सोलापूरचे विसावे पोलिस आयुक्त म्हणून ते पदभार स्वीकारतील.
बैजल यांची जागा घेणार
पोलिस आयुक्त हरीश बैजल 31 मे रोजी निवृत्त झाले. सध्या पुणे सीआयडी विभागाचे उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांच्याकडे एक जूनपासून सोलापूर पोलिस आयुक्त पदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला होता. माने हे मूळचे नगर जिल्ह्यातील आहेत. 1995 साली ते थेट डीवायएसपी पदावर पोलिस दलात आले. त्यांनी वर्धा, गडचिरोली, नगर, उस्मानाबाद, पुणे येथे विविध पदावर काम केले आहे. लातूरला पोलिस अधीक्षक म्हणून ते काम करत होते. त्यानंतर राज्य गुप्तवार्ता येथे पदोन्नतीवर त्यांची बदली झाली होती.
दोन दिवसांत पदभार घेणार
माने हे 2009 ते 2012 या कालावधीत पोलिस उपायुक्त ( परिमंडळ) पदावर कार्यरत होते. त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, येत्या एक-दोन दिवसात सोलापूरमध्ये रुजू होणार आहे. मुंबईतचा पदभार सोडल्यानंतर शुक्रवारी, शनिवार किंवा सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याचे ते म्हणाले. माने हे शिस्त, संयम, वक्तशीरपणासाठी ओळखले जातात.
हिरेमठ यांची चुणूक
सध्या प्रभारी पोलिस आयुक्तपद सांभाळणारे हिरेमठ यांनी वाहतूक शाखा, गुन्हेगारी नियंत्रण आणण्यात यश मिळवले होते. अधिकारी - कर्मचारी यांच्यात समन्वय ठेवत सात दिवसांत त्यांनी कामाची चांगली चुणूक दाखवली होती, पण ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरुपात होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.