आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांकडून नैसर्गिक रंग निर्मिती‎:ठोकळ प्रशालेत कार्यशाळा,‎ पर्यावरणपूरक उत्सव‎

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ निसर्गाचे संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य‎ आहे. रंगपंचमी वापरण्यात येणारे कृत्रिम व‎ विविध रसायनयुक्त रंग हे शरीराला हानी‎ पोहोचवू शकतात. निसर्गातील उपलब्ध‎ साहित्यातून रंग बनवून त्याचा वापर‎ रंगपंचमी निमित्त करण्यात यावा. असा‎ संदेश देत निर्मलाताई ठोकळ प्रशाला व‎ कनिष्ठ महाविद्यालय नैसर्गिक रंग‎ बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली.‎ प्रात्यक्षिकातून रंग निर्मिती केली,‎ निसर्गनिर्मित रंगाचे फायदे विद्यार्थ्यांनी‎ जाणून घेतले.‎ सामाजिक वनीकरण विभागातील‎ कर्मचारी संजय भुईटे यांनी विद्यार्थ्यांना‎ निसर्गनिर्मित रंग, निर्मिती, कोणते रंग‎ बनवता येतात, त्याचा वापर, त्याच्या‎ वापरातील फायदे व कृत्रिम रंगाचे शरीरावर‎ होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन केले.‎ त्यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून व स्व‎ प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून नैसर्गिक‎ रंगनिर्मिती करून दाखविले. या‎ उपक्रमासाठी शाळेचे प्राचार्य डी. डी. गाजरे‎ यांचे मार्गदर्शन लाभले. उर्मिला लंबे यांनी‎ सूत्रसंचालन केले. पूनम पाटील यांनी‎ आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...