आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेद महाविद्यालयात अग्निकर्म कार्यशाळा:जुनाट व्याधीवर अग्निकर्म उपचार केल्यास कायमचा इलाज - डॉ देशमुख

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निरामय दीर्घायुष्यासाठी आजच्या वैज्ञानिक युगातही आयुर्वेदाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भौतिक साधनांच्या सवयीमुळे व बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक रोगांचा अकाली प्रादुर्भाव वाढला आहे. गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, टाचदुखी, स्पोंडीलिसिस, खांदे दुखी यासारखे वातविकार वाढत आहेत. यावर होणारी शस्त्रक्रिया व खर्च मोठ्या प्रमाणावर आहे. यावर अग्निकर्म पद्धतीने उपचार केल्यास कायमची सुटका होऊ शकते, असे प्रतिपादन आयुर्वेद व अग्निकर्मचे विशेष अभ्यासक डॉ. चंद्रकुमार देशमुख यांनी केले.

शेठ गोविंद रावजी आयुर्वेद महाविद्यालयात जागतिक आयुर्वेद काँग्रेस व नस्या यांच्या संयुक्त विद्यमाने अग्निकर्म या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी करण्यात आले होते. यावेळी जागतिक आयुर्वेद परिषदेचे समन्वयक डॉ. नारायण जाधव, प्रमुख पाहुणे डॉ. कौशिक दाते, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे, प्राचार्या डॉ. वीणा जावळे, उपप्राचार्य डॉ.शांतिनाथ बागेवाडी, प्रशासकीय अधिकारी अनुप दोशी उपस्थिती होते.

उपस्थितांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व धन्वंतरी स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिल्पा येरमे यांनी केले यामध्ये कार्यशाळेच्या आयोजनाबद्दलचा हेतू सांगून संस्थेची माहिती सांगितली.

यानंतर परिषदेचे समन्वयक डॉ. नारायण जाधव यांनी आचार्य सुश्रुत यांच्या सिद्धांतानुसार भैषज, क्षार, अग्निकर्म व शस्त्र या उपायानुसार सगळ्याच आजारात आयुर्वेद सिद्धांत पाळण्यासाठी अग्निकर्म केला जातो असे सांगितले. ही परिषद आयुर्वेदाची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्य विभागाच्या सहकार्याने वेदा पासून पूर्ण तंत्र ज्ञानापर्यंत भारतीय चिकित्सा पद्धतीचा जगभर प्रचार व प्रसार करण्यासाठी केला जात आहे.

डॉ. कौशिक दाते यांनी आपल्या भाषणात राग, मोह, विकार,रिपू यावर विजय मिळवून खुल्या मनाने आपल्याकडील ज्ञान जनसामान्यांच्या उपयोगासाठी कसे पोहोचवता येते, पा अनुबोधन आणि अनुष्ठान या त्रयींचा वापर चिकित्सेसाठी करा असे विचारले मांडले. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील विविध भागातील डॉक्टर्स, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, अध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ कल्पना पांढरे यांनी केले.

रुग्णावर अग्नीकर्म

अग्निकर्म ही भारतीय वैद्यक पध्दतीमधे वर्णन केलेली वेदना व्यवस्थापन प्रक्रिया आहे. कोणत्याही प्रकारच्या वेदनांसाठी ही प्रक्रिया आहे. अग्निकर्म ज्याला थर्मल मायक्रोकौटरी असेही म्हणतात. सुश्रुतसंहितेच्या ग्रंथात नमूद केले आहे. ही आयुर्वेदामधे वेदना किंवा रक्तश्रावद्वारे वैशिष्ट्ये कृत विविध सौम्य रोगासाठी वापरली जाणारी प्रक्रिया या प्रक्रियेत सोने,चांदी, तांबे आणि पंचधातू च्या तापलेल्या काड्या थेट प्रभावित जागेवर, त्वचेवर लावल्या जातात. याची माहिती दिली व प्रत्यक्षपणे प्रत्येक आजारावर रुग्णावर अग्नीकर्म करून डॉ देशमुख यांनी प्रत्यक्ष करुन दाखविले.

बातम्या आणखी आहेत...