आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जागतिक पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल बी.एस. कोश्यारी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मुंबईहून परतताना त्रास जाणवल्याने त्यांनी चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सोलापूरच्या परितेवाडी शाळेत शिक्षक असलेले रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार मिळाला आहे.
जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह महादेव डिसले यांचा दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला होता. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. या सत्कार समारंभासाठी सरकारने डिसले यांच्या आई पार्वती आणि वडील महादेव डिसले यांनाही खास निमंत्रित केले होते आणि त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी डिसले यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना राज्य सरकार पूर्ण मदत करेल असे आश्वासन दिले. राज्यात प्राथमिक शिक्षणात अमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी राज्य सरकारने एक टास्क फोर्स तयार केला आहे. त्याच्या माध्यमातून आता ‘डिसले पॅटर्न’ राज्यभर राबविण्यात येणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.