आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिध्देश्वर यात्रा जवळ येत असून, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या घेण्याचे काम सुरु आहे. विजापूर रोडवरील रेवणसिध्देश्वर मंदिर समोरील मैदानात जनावर बाजार भरतो. या जनावर बाजार भरण्यास महापालिकेने अद्याप परवानगी दिली नाही. यात्रेच्या तयारीसाठी रस्ते दुरुस्तीसह अन्य कामे करण्यात येत असल्याची माहिती पालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली. नंदीध्वज मिरवणुक मार्गावर दुरूस्ती काम करण्यात येत असून, पालिका नगर अभियंता कार्यालयाने काम सुरु केले आहे.
पालिका आवारात झळकणार छायाचित्र
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट या देशपातळीवरील संस्थेच्या माध्यमातून महापालिकेच्या इंद्रभुवन व आवारातील इमारतीमध्ये शहराची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा दर्शविणारी छायाचित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत .त्याअंतर्गत ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील ठळक घडामोडीं छायाचित्रांच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न आर्किटेक्ट शशिकांत चिंचोळी यांच्या कल्पनेतून करण्यात आला आहे. ही छायाचित्रे महापालिका आवारातील वेगवेगळ्या इमारतीतील दालने आणि स्वागतिका परिसरात झळकणार आहेत.
होम मैदान मंदिर समितीच्या ताब्यात
करारानुसार होम मैदानासह तो रस्ता १५ डिसेंबर पासून मंदिर समितीच्या ताब्यात असून, तेथे खोदकाम न करता वापरू शकता असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. तेथे रस्त्याच्या रहदारीस अडथळा होईल असे कैंची पध्दतीने मंडप टाकता येतो पण तेथे फुटपाथवर पहार मारून मंडप उभारण्यात येत आहे. त्यामुळे फुटपाथला बाधा येऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.