आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळीत हंगाम:येडेश्वरी शुगर्सचे आज बॉयलर अग्निप्रदीपन ; टप्प्याटप्याने बिले देण्यात येणार

बार्शीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येडेश्वरी शुगर्सचे गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोमवारी हाेणार आहे. समारंभ श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, त्र्यंबकेश्वरचे अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते व वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज यांच्या उपस्थितीत हाेणार असल्याची माहिती येडेश्वरी शुगर्सचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा कारखाना ६९ कोटी रुपयांना घेतला. विविध खर्चासह १२० कोटी रुपयांना पडल्याचे ते म्हणाले.

थकीत बिल टप्प्याने देणार, पहिला टप्पा उद्यापासून मागील हंगामात एक लाख ३८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. त्यावेळची एफआरपी १८०० रुपये प्रतिटन गृहीत धरून देणे प्रलंबित आहे. त्यापैकी सहा कोटी ८० लाख रुपये पेमेंट त्या वेळेच्या मॅनेजमेंट दिले आहे. थकीत पाच हप्त्यांची बिले देण्यात येणार असून, ज्या हप्तात ऊस गेला त्या पध्दतीने टप्प्याटप्याने बिले देण्यात येतील. पहिला हप्त्याचे वाटप ३ जानेवारीपासून सुरुवात करत आहोत.

बातम्या आणखी आहेत...