आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा वॉर:तुम्ही अनगर सोडा, मी नरखेड सोडून उभा राहतो; हरल्यास राजकारणातून संन्यास

मोहोळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘भीमा कारखान्याच्या निवडणुकीत कोणाची किती ताकद आहे? हे स्पष्ट झाले आहे. तुम्ही तुमचे अनगर सोडा, मी माझे नरखेड सोडतो. कोणत्याही मतदारसंघात येऊन स्वतः निवडणूक लढा. माझा पराभव झाला तर तालुक्याचे नव्हे जिल्ह्याचे राजकारण सोडतो. एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या विरोधात उभे करून त्याला त्याचे घर-प्रपंच कशाला उद््ध्वस्त करायला लावता’, असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांना दिले. उमेश पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत राजन पाटील यांच्यावर टीका केली.

या वेळी ज्येष्ठ नेते पद्माकर देशमुख, लोकनेते शुगरचे माजी व्हाइस चेअरमन मानाजी माने, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, राहुल क्षीरसागर, शिवसेनेचे शहर प्रमुख विक्रम देशमुख, प्रसन्न पाटील, सुरेश चव्हाण, संजय विभूते, बाळासाहेब मोटे, शिक्षक संघटनेचे नेते श्यामराव जवंजाळ, अप्पासाहेब पाटील, सागर जाधव, अजिंक्य क्षीरसागर, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते. पुढे पाटील म्हणाले, भीमा कारखान्याच्या निवडणुकीत पराभव होतो म्हणाल्यावर स्वतःच्या घरातील कोणाला उभे केले नाही. उगाच जाहिराती करायच्या? दोन वाघाने सगळ्यांना कामाला लावले. मग वाघानेच लढावे. कशाला कार्यकर्त्यांना पुढे करता? भीमाच्या प्रचार सभेतील वक्तव्यानंतर त्यांना जर दिलगिरी व्यक्त करायची असती तर त्यांनी त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली असती. स्वतःच्या मुलाला जिल्हाध्यक्ष होण्याकरता पक्षाच्या नेत्यांकडे, माझ्याकडे शिष्टमंडळ घेऊन हेलपाटे मारत होते. मग त्यांना राष्ट्रवादी पक्षाचा प्रवक्ता असताना मी माहीत नव्हतो का? आणि हे तालुक्याचे नेते सांगतात उमेश पाटलांना मोहोळ तालुक्यातील लोक ओळखत नाहीत. तुम्हाला तालुका सोडले तर बाहेर कोण ओळखते का? हे अगोदर बघा. निवडणुकीतील पराभव विनम्रतेने स्वीकारायचा असतो. सभासदांचे आभार मानायचे असतात.

परंतु विरोधकांची वक्तव्य काय आहेत, याचा तालुक्यातील जनतेने विचार करावा? जनतेचा कौल स्वीकारण्याची त्यांची मानसिकता नाही. खून केल्याचा अभिमान असल्याचे उर बडवून सांगणारांना तालुका कदापि सहन करणार नाही. आतापर्यंत भीती दाखवून राज्य केले. ती परिस्थिती राहिली नाही, असे सांगत उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर टीका केली. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तालुक्याचा विकास, तालुक्याचे भले करायची ज्याची मानसिकता नाही, अशा स्वतःला नेते म्हणून घेणाऱ्यांच्या विरोधात आघाडी करून निवडणुका लढवणार असल्याचीही उमेश पाटील यांनी सांगितले.

विकास आराखडा आकसबुद्धीने
मोहोळ नगरपरिषदेचा विकास आराखडा हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आला असून, शहराचा विकास हा आकसबुद्धीने आराखड्याच्या माध्यमातून असंतुलित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नागरिकांनी या संदर्भात हरकती घेतल्या पाहिजेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ मदत द्यावी. पूर्वकल्पना न देता शेतकऱ्यांची वीज तोडणी करू नये. तालुक्यातील चाळण झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ही पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे उमेश पाटील यांनी सांगितले.

देशमुख खटल्यासंदर्भात मुख्य न्यायाधीशांना पत्र
३०२ ची कलम भोगलेली आमची पोरं आहेत, असे म्हणून लोकांना जाहीर धमकी देता. १७ वर्षे झाले तरी स्वर्गीय पंडित देशमुख खून खटल्याची केस उच्च न्यायालयात उभी राहत नाही. यामध्ये सरकारी यंत्रणा की आणखी कोण मॅनेज आहे? यासंदर्भात तालुक्यातील सर्वजण मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून ती केस पुन्हा ओपन करण्याची मागणी करणार आहोत.

बातम्या आणखी आहेत...