आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्मिती:युवा निर्माता, दिग्दर्शकाने तयार केला ‘साखरेचं झाड’ मराठी चित्रपट, चित्रपटचा टीझर नुकताच प्रा. दीपक देशपांडे यांच्या हस्ते प्रदर्शित

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पटकथा, कथा, संवाद, दिग्दर्शन, निर्माता, पार्श्वसंगीत, कलाकार अशा सर्व बाजूंनी सोलापूरच्या मातीत घडलेला ‘साखरेचं झाड’ मराठी चित्रपट तयार झाला आहे. हा चित्रपट ७० एमएम असून लवकरच पडद्यावर झळकणार आहे.

चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन संदीप भास्कर जाधव यांनी केले आहे. डॉ. विशाल गोरे आणि राज खरात निर्माते आहेत. बाल विश्वावर आधारित या चित्रपटचा टीझर नुकताच प्रा. दीपक देशपांडे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला.

प्रमुख भूमिकेत आर्यन खरात, वाणी जाधव, अखिलेश बनसोडे, ओम शिंदे ओमकार शिंदे, अफजान जमादार, श्रेयस साळुंके हे बाल कलावंत चमकणार आहेत. त्याशिवाय डॉ. संतोष सुर्वे, शैलेश वाडकर, कमलप्रभा हावळे, शहाजी भोसले, राजू गायकवाड, महासिद्ध देशमुख आणि इतर कलावंत विविध भूमिकेतून पहायला मिळणार आहेत.

संगीतही सोलापूरच्या कलावंतांचे
चित्रपटाला संगीत आनंद भालेराव आणि शिवाजी बनसोडे या जोडगोळीने दिले आहे. पार्श्वसंगीत विशाल -समाधान या दोन युवकांनी केले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये अवधूत गुप्ते यांनी गीत गायले आहे.

बाल विश्वावर आधारित चित्रपट
हा चित्रपट बालविश्वावर आधारित असून मी सोलापुरातील बाल कलावंतांना तुम्ही ठेवून हा चित्रपट केला आहे. याशिवाय पार्श्वसंगीत संगीत संयोजन आणि बाकीचे सर्व कलावंत देखील मी सोलापुरातून घेतले असून या चित्रपटाची निर्मिती देखील सोलापूरच्या डॉ. विशाल गोरे आणि राजू खरात यांनी केली आहे. त्यामुळे सबकुछ सोलापूर मात्र उत्कृष्ट प्रकारचे चित्रपट असं रसिकांना पाहायला मिळणार आहे.’’
संदीप जाधव, दिग्दर्शक

बातम्या आणखी आहेत...