आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांचा ट्रेक:युवकाचा २ महिन्यांत २८ किल्ल्यांचा सोलो ट्रेक; प्रवास खर्च शून्य

अजित बिराजदार | सोलापूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतेही अंतर लांब वाटत नाही. प्रख्यात मराठी साहित्यिक व.पू.यांचे हे वाक्य मनात रुंजी घालत होते. एक दिवस निर्णय पक्का झाला. लिफ्ट मागत सह्याद्री भटकण्यासाठी सोलो ट्रेकवर निघालो. सांगत होता सोलो ट्रेकर सिद्धाराम बिराजदार.

सलग दोन महिन्यांचा ट्रेक आखला. सॅक सोबत घेतली. आवश्यक तितकेच कपडे. बूट, ट्रॅक सूट आणि खिशात अवघे पाच -सहाशे रुपये. प्रवास खर्च शून्य.गड, किल्ले आणि अवघा सह्याद्रीच्या पर्वतरांगा अशी ६१ दिवसांची भ्रमंती सुरू केली. प्रवासात कायम लिफ्ट मागितली. पाहुणचार मिळेल तो स्वीकारला. मिळेल तेथे जेवण. मुक्काम अर्थात पेट्रोल पंप, शाळा, मंदिर येथे. मिळेल तेथे पथारी पसरली. १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा हा ट्रेक, या युवकाने कमीत कमी खर्चात आणि एकट्याने पूर्ण केला.

स्वत:चा आणि सह्याद्रीचा शोध..
पूर्वी टू इज कंपनी म्हणायची, थ्री इज क्राऊड. मात्र आजकाल सोलो ट्रेकिंगची क्रेझ चांगलीच वाढली आहे. सिद्धाराम बिराजदार याने या ट्रेकिंगमध्ये स्वत:चा व सह्याद्रीचा शोध घेतला. गो प्रो कॅमेरा व मोबाइल चित्रीकरण करून फिल्म बनेल इतकी डिजिटल सामग्री तयार केली. अनुभवांची जोड दिली. संस्मरणीय तितकेच साहसी क्षण अनुभवल्याचे त्याने सांगितले.

पन्हाळा गड ते पावनखिंड
पन्हाळा गड ते पावनखिंड मार्गावर घनदाट अरण्य, मुसळधार पाऊस, यासह सांधन दरी, कळसुबाई शिखर, रतनगड, हरिश्चंद्र गड, हरिहर फोर्ट, रामशेज फोर्ट, सप्तश्रृंगी गड, धोडप, साल्हेर, मांगी, तुंगी, शिवनेरी, निमगिरी हणुमंतगड, जीवधन फोर्ट असे २८ किल्ले, सात शहर, जंगल, सह्याद्रीतील ग्राम जीवन, शेतकऱ्यांचे आयुष्य व स्वत:ला शोधत राहिलो.
सिद्धाराम बिराजदार, सोलो ट्रेकर, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...