आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाॅर्टसर्किटमुळे आग‎ लागल्याचा अंदाज:पहाटेच्या आगीत जकातचे दफ्तर जळाले‎

सोलापूर‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी पहाटे इनडोअर‎ स्टेडियमच्या गाळ्यांना लागलेल्या‎ आगीत पालिका आयात कर‎ विभागाचे दफ्तर जळून खाक झाले.‎ सात रस्ता परिसरातील परिवहन‎ डेपोमागील बाजूसच्या पालिकेचे‎ इनडोअर स्टेडियम आहे. पहाटे दीड‎ वाजण्याच्या सुमारास लागलेली‎ आग दाेन बंब पाणी फवारून‎ अग्निशमन विभागाने आटाेक्यात‎ आणली.

शाॅर्टसर्किटमुळे आग‎ लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.‎ बाॅस्केटबाॅलसह इनडोअर क्रीडा‎ प्रकार या ठिकाणी खेळले जातात.‎ पार्क स्टेडियमच्या नूतनीकरणावेळी‎ तेथील जकात विभागाचे दफ्तर‎ इनडोअर स्टेडियममधील पश्चिम‎ बाजूच्या दोन गळ्यांत ठेवले होते.‎ सन २०१० पासूनचे हे दफ्तर होते.‎ आग लवकर अाटाेक्यात अाल्याने‎ इनडोअर स्टेडियमचे फारसे‎ नुकसान झालेले नाही.‎

दप्तर हलवण्याची मागणी‎
इनडाेअर स्टेडियममधील दफ्तर‎ हलवून तेथे क्रीडा साहित्य ठेवावे,‎ अशी मागणी बाॅस्केटबाॅल संघटनेने‎ केली हाेती. तरीही दफ्तर हलवले‎ नव्हते. गुरुवारी सकाळी पालिका‎ उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी‎ घटनास्थळी जाऊन नुकसानीची‎ पाहणी केली. यात जकात विभागाचे‎ साहित्य जळाल्याने संबंधित‎ अधिकाऱ्यांना नुकसानीची माहिती‎ घेण्यास सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...