आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • ZP, Panchayat Samiti Gana Should Be Reserved For Disabled 28 Objections Filed On Zilla Parishad, Panchayat Samiti Election Reservation Process

दिव्यांगासाठी ZP, पंचायत समिती गण आरक्षित हवा:जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आरक्षण प्रक्रियेवर 28 हरकती दाखल

सोलापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमधून निवडणूक लढवण्यासाठी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम कायदा 2016 नुसार मतदारसंघ राखीव असावा, अशी मागणी भाजप दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष वैजिनाथ धेडे, दिव्यांग नवनिर्माण सेनेचे पांडुरंग जाधव यांनी निवडणूक विभागाकडे लेखी पत्र दिल आहे. जिल्ह्यातून एकूण 28 जणांनी आरक्षण सोडतीवर हरकती नोंदवल्या आहेत.

जिल्हा परिषदेचे 77 गट व पंचायत समितीच्या 154 गणांची आरक्षण सोडत प्रशासनातर्फे 28 जुलै रोजी काढण्यात आली. आरक्षणामुळे ग्रामीण भागातील अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. तर, काहींना आपले नशिब आजमावण्याची संधी मिळणार आहे.

4 हरकती दक्षिण सोलापूरच्या

दरम्यान, प्रशासनाने काढलेल्या आरक्षण सोडतीवर 2 जुलैपर्यंत हरकती, सुचना मागवण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषदेसाठी एकूण 18 हरकती दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 4 हरकती दक्षिण सोलापूरच्या आहेत. दक्षिण सोलापूर काँग्रेसचे अध्यक्ष हरिष पाटील यांनी भंडारकवठे गटाची आरक्षण सोडत बेकायदेशीर झालेली अशी हरकत नोंदवली. प्रशांत कांबळे (लवंगी) यांनी भंडारकवठे गटामध्ये अनुसूचित जातींची संख्या जास्त असल्याने एससीसाठी राखीव करा, होटगी गट अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव ठेवण्याऐवजी ओबीसीसाठी राखीव हवा, अशी हरकत इंद्रजीत लांडगे यांनी नोंदवली.

नियमानुसार कामकाज नाही

कामती गटाचे आरक्षण सोडत महिलांचे राखीव जागा निश्चित करताना नियमानुसार कामकाज झाले नाही, अशी हरकत प्रदीप आमले यांनी घेतली आहे. कोळा (सांगोला) गटाचे आरक्षण सर्वसाधारण किंवा ओबीसीसाठी राखीव व्हावा, अशी हरकत संभाजी अलदर यांनी नोंदवली.

5 ऑगस्टला अंतिम आरक्षण

दिव्यागांनी दिलेल्या निवेदनाची नोंद मागणी म्हणून करायची की आरक्षण सोडतीवर हरकत, असा संभ्रम निवडणूक शाखेतील कर्मचाऱ्यांमध्ये होता. पण, हरकत म्हणून या नोंदवण्यात आल्या आहेत. एकूण हरकती, सूचनांचा विचार करून 5 ऑगस्टला अंतिम आरक्षण प्रसिद्ध होणार आहे. उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

बातम्या आणखी आहेत...