आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी सर्व कार्यकर्त्यांनी करावी. आघाडीबाबत धोरणात्मक निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंग मोहिते यांनी केले आहे.
सोलापूर जिल्हा काँग्रेसचा एक दिवसीय मेळावा घेण्याबाबत नियोजन करण्यासाठी बैठक गुरुवारी (ता. 9) काँग्रेस भवनमध्ये झाली. माजी आमदार निर्मला ठोकळ अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी जिल्हा संघटक रमेश हसापूरे, वरिष्ठ उपाध्यक्ष भीमाशंकर जमादार, बाजार समितीचे उपाध्यक्ष श्रीशैल नरोळे, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, अशोक देवकते, विजयकुमार हत्तुरे, दक्षिण सोलापूर काँग्रेसचे अध्यक्ष हरिष पाटील, ओबीसी सेलचे सुधीर लांडे, मंगळवेढाचे नंदकुमार पवार, मंद्रूपचे महंमद शेख, अश्पाक बळोरगी, काँग्रेस सेवादलचे राजेश पवार आदी उपस्थित होते.
श्री. मोहिते म्हणाले, “राष्ट्रीय काँग्रेसचे काँग्रेसचे उदयपूर (राजस्थान) येथे व प्रदेश काँग्रेसचे शिर्डी येथे बैठक झाली होती. राष्ट्रीय व प्रदेश बैठकांमधील चर्चा, धोरणात्मक निर्णयांची माहिती देण्यासाठी जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात येणार आहे. त्यास राज्यस्तरीय नेतेमंडळी, पक्षाचे काही मंत्री उपस्थित राहणार आहे. त्यामध्ये प्रमुख सहा घटकांबाबत समुह बैठक, चर्चा होतील. त्यामधील निर्णय मेळाव्यात सांगण्यात येतील.
पावसाळ्याचे दिवस, सर्वांना सोईस्कर ठिकाणाची निवड करून सर्वांना त्याबाबतची माहिती देण्यात येईल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा महत्वाचा आहे. त्यास सर्वांनी उपस्थित रहा, कोणतीही कारणं सांगून गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, असा इशारा त्यांनी दिला. याप्रंसगी जिल्हा सचिव महंमद शेख यांनी मंद्रूप येथे तालुकास्तरीय मेळावा घेण्याची मागणी केली. राजेश पवार यांनी मोहोळ येथे मेळावा घेण्याची मागणी केली. सर्व तयारी सर्वांच्या मदतीने व्यवस्थित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
सातलिंग शटगार यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने जिल्ह्यात काँग्रेसतर्फे मोठी रॅली काढण्याबाबतची माहिती दिली. स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस पक्ष सक्रीय होता. दोन ते तीन दिवसांची रॅली अनेक तालुक्यांमधून काढणे, गाव व वाड्यवस्त्यांवर जाऊन काँग्रेसचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची माहिती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.