आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षता:किराणा दुकानांसाठी आता 2 तासांचा वेळ, सकाळी 9 ते 11 पर्यंतच खुली राहणार; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

उस्मानाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • शहरी तसेच ग्रामीण भागासाठी आदेश, उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळून आल्यानंतरही रस्त्यांवरील नागरिकांची गर्दी होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी किराणा दुकानांची वेळ सकाळी 9 ते 11 पर्यंतच खुली ठेवण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे सकाळी 9 ते 11 या वेळेतच नागरिकांना किराणा साहित्याची खरेदी करता येणार आहे. रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी मंगळवारी (7 एप्रिल) हे आदेश निगर्मित केले आहेत. उमरगा तालुक्यात दोन आणि लोहारा तालुक्यात 1, असे जिल्ह्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. वास्तविक पाहता छुप्या मार्गाने अनेकजणांनी जिल्ह्यात एन्ट्री केली असून, असे अनेक रुग्ण समाजात वावरत असल्याचा प्रशासनाला संशय आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरून तसेच मरकजला (दिल्ली) जाऊन आलेल्यांनी समोर येऊन आपली आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कोरोनाचा संसर्ग असलेल्या भागातून आलेल्या नागरिकांनी समोर न आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळेच अशा रुग्णांवर गावपातळीवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. गावच्या पोलिस पाटलांनाही असे नागरिक शोधून काढण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात कोरोना हळहळू पाय पसरत असताना नागरिकांमध्ये अजूनही फारसे गांभीर्य दिसत नाही. रस्त्यांवर सामान्यपणे गर्दी दिसत असून, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे. पोलिसांकडून वारंवार आवाहन करण्यात येत असले तरी नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. किराणा साहित्य, भाजीपाला, दवाखान्याचे कारण सांगून रस्त्यावर फिरणाऱ्यांना अंकुश घालण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मंुडे यांनी किराणा दुकाने सुरू ठेवण्यासाठी वेळ निर्धारित केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी काढलेल्या आदेशानुसा आता बुधवारपासून सकाळी 9 ते 11 या वेळेतच किराणा दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागासाठी हे आदेश असून, या आदेशाचा भंग झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...