आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उस्मानाबाद:तब्बल 50 दिवसांनंतर एसटी रस्त्यावर धावल्या, प्रत्येक प्रवाशाला सॅनिटायझर

उस्मानाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • बस सोडण्यापूर्वी ती पुर्णपणे सॅनिटायझर करून घेण्यात आली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस तब्बल 50 दिवसांनंतर सोमवारी जिल्ह्याअंतर्गत रस्त्यावर धावल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवर लॉक डाऊन घोषित झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील 6 आगारांतर्गत असलेल्या 475 बसची चाके मागील पन्नास दिवसापासून आगारात ठप्प होती. यामुळे एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागास दररोज 45 लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत होते. परिणामी या लॉक डाऊन कालावधीत एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मात्र, राज्य शासनाने ग्रीन झोनमध्ये जिल्ह्यात अंतर्गत एसटी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार, दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनीही बस फेऱ्यांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर दि 11 मे पासून एसटी महामंडळाने अंतर्गत बस फेऱ्यांचे नियोजन केले होते. 

या नियोजनानुसार सोमवारी सकाळी प्रत्येक तालुक्यातुन सकाळी दोन बस रहदारीच्या मार्गावर सोडण्यात आल्या. उस्मानाबाद बसस्थानक येथून सकाळी 8,15 वाजता उस्मानाबाद ते उमरगा ही बस 15 प्रवाशी घेऊन तर 9 वाजता उस्मानाबाद ते कळंब ही बसफेरी 12 प्रवाशी घेऊन रवाना झाली. अशाच प्रकारे सकाळी परंडा, उमरगा, तुळजापूर, कळंब, भूम या स्थानकातून दोन बस सोडण्यात आल्या.

प्रत्येक प्रवाशाला सॅनिटायझर

बस सोडण्यापूर्वी ती पुर्णपणे सॅनिटायझर करून घेण्यात आली होती, तसेच बसमधील सर्व प्रवाशांना हातावर सॅनिटायझर देऊन स्वच्छता करण्यास व मास्क असलेल्या 10 वर्षावरील व 65 वर्षाखालील प्रवाशांना प्रवेश देण्यात आला. तसेच निघण्याच्या ठिकाणावरून फक्त प्रवाशी घेत त्याना निर्धारित ठिकाणी सोडण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. मध्ये कोठेही प्रवाशी घेऊ नयेत असेही सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...