आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महावितरण:वाशी शहरातील वीज पुरवठा 5 दिवसांपासून बंद, महिलांचा ठिय्या

वाशीएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • कार्यालयाला सुटी असल्याने लाईनमान वगळता एकही अधिकारी हजर नाही

नवनाथ टकले 

महावितरण कार्यालयाकडून वीज पुरवठा सुरळीत केला जात नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी वाशीच्या वीज उपकेंद्रासमोर ठिय्या मांडला असून, 5 दिवसांपासून खंडित असलेला वीजपुरवठा सुरळीत करावा,अन्यथा कार्यालयासमोरून उठणार नाही, अशी भूमिका महिलांनी घेतली आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान वाशी येथील महावितरण उपकेंद्रासमोर असलेल्या 500 कुटुंबाचा वीजपुरवठा गेल्या 5 दिवसापासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

वाशी महावितरण उपकेंद्रासमोर असलेल्या भागामध्ये मागील 5 दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे महिलांनी जाब विचारण्यासाठी थेट उपकेंद्र गाठले. 

कार्यालयाला सुटी असल्याने लाईनमान वगळता एकही अधिकारी हजर नसल्याने प्रश्न सुटण्यासाठी शक्यता कमी असून, भर उन्हात महिलांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे.प्रचंड उन्हात सुरू असलेल्या या आंदोलनाला वाशी शहरातील नागरिकांचा पाठिंबा मिळत गेल्यास विपरीत परिणाम होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...