आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जामोद:एकाच ठिकाणी आढळले तब्बल 123 साप; ग्रामस्थांनी सर्व मारले

जळगाव जामोदएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 123 साप आढळल्याने नागरिकांत प्रचंड घबराट

तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील तानकर वेस या ठिकाणी ३० एप्रिलच्या सायंकाळी राहुल बहादरे आणि कैलास केदार यांच्या किराणा दुकानाजवळ असलेल्या नालीजवळ एकामागे एक १२३ साप आढळल्याने नागरिकांत प्रचंड घबराट पसरली.

या भागात काही युवक बसलेले होते. अगोदर दोन साप दिसताच युवकांनी काठीने दोन्ही साप मारले. नंतर एकापाठोपाठ एक असे १२३ साप आढळून आल्याने घाबरलेल्या गावकऱ्यांनी या सर्वच सापांना मारले.

या घटनेमुळे सकाळी बघ्यांची गर्दी झाली होती. या भागात आता आणखी साप निघणार नाहीत, मनातून भीती काढून टाका, असा सल्ला सर्पमित्रांनी दिला. पिंपळगाव काळे येथे आढळलेले साप कोब्रा व पान दिवळ प्रजातीचे असल्याचे बुलडाणा येथील सर्पमित्र एस. बी. रसाळ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...