आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • 8 Policemen Including Senior Police Inspector Suspended In Pune City; News And Live Updates

खळबळ:पुणे शहरात वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह 8 पोलिस निलंबित; अप्पर पोलीस महासंचालकांकडून निलंबणाची कारवाई

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कारवाईने पोलीस दलासह पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

पुणे शहरात पोलीस निरीक्षकासह 8 पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्रसिंग गौड यांच्यासह पोलीस ठाण्यातील 8 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ही निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपींवर तात्काळ कारवाई न करता त्यांना हॉटेलात ठेवून कारवाईला वेळ घालवला असा ठपका निलंबित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. या कारवाईने पोलीस दलासह पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

निलंबित केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये पोलिस निरीक्षक सुरेंद्र गौड, पोलीस शिपाई संतोष विष्णू लाखे, माधव मारुती झेंडे, गणेश अशोक शिंदे, श्रीकांत मार्केंडय बोनाकृती, गंगाधर केशाव, अशोक अकबर गायकवाड आणि कैलास प्रकाश जाधव यांचा समावेश आहे. पुणे लोहमार्गच्या रेल्वे पोलिसांनी 2020 मध्ये अमली पदार्थाचे मोठे रॅकेट पकडले होते. या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली होती. थर्टी फस्टच्या आयोजित पार्ट्याना हे अमली पदार्थ पुरवले जाणार असल्याचे त्यावेळी सांगितले जात होते. या कारवाई डिसेंबर 2020 मध्ये झाली असून यामध्ये 1 कोटी 3 लाख रूपयांचा चरस पकडला गेला होता. हिमाचल प्रदेश येथून हे चरस आणले जात होते.संबंधित प्रकरणात अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र, कालांतराने हा गुन्हा तपासासाठी एटीएसकडे वर्ग करण्यात आला. त्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना एटीएसला या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल न करता विलंब केला. अंमली पदार्थांसह ताब्यात घेतलेल्या आरोपींवर तत्काळ कारवाई न करता त्यांना काही दिवस पुणे रेल्वे स्टेशन जवळील हॉटेलमध्ये ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. एटीएसने आरोपींचा ताबा घेत चौकशी सुरू केली.

त्यात जबाब घेण्यात आला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पोलीस निरीक्षक गौड कायम रेल्वे पोलीस दलात वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. काही प्रवाशांना तपास आणि चौकशीच्या नावाखाली अडवून लुटले जात असल्याचे तक्रारी करण्यात आल्या होत्या. नुकतीच एका राजकीय पक्षाने देखील याबाबत आवाज उठवत तक्रार केली होती.

बातम्या आणखी आहेत...