आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

खामगाव:गंजीला आग लावून वृद्ध दांपत्याने केली आत्महत्या, गेल्या 25 वर्षांपासून राहत होते विभक्त 

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खामगावच्या जयपूर लांडे येथील थरारक घटना
Advertisement
Advertisement

पऱ्हाटीच्या गंजीला आग लावून त्यात उडी घेऊन वयोवृद्ध दांपत्याने आत्महत्या केल्याची घटना खामगावातील जयपूर लांडे शिवारात शुक्रवारी उघडकीस आली. दरम्यान, या दांपत्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत असला तरी खामगावचे उपविभागीय पाेलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. हे दांपत्य गेल्या २५ वर्षांपासून विभक्त राहत होते. उतारवयात कसे जगावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिल्याने त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय आहे.

शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या जयपूर लांडे येथील रहिवासी श्रीकृष्ण लांडे (७५) आणि त्यांची पत्नी सईबाई लांडे (७०) हे गुरुवारी नित्यनियमाप्रमाणे गाव शिवारातील शेतात काम करण्यासाठी गेले होते. काही दिवसांपूर्वीच या शेतात पऱ्हाटी उपटून गंजी घालण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास दांपत्याने गंजीला आग लावली. त्यानंतर दोघांनी त्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांचा पुतण्या व मुलगा भानुदास लांडे हे शेताकडे गेले असता त्यांना शेतातील गंजीमध्ये दोघेही जळलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. दरम्यान, हे दांपत्य गेल्या २५ वर्षांपासून मुलांपासून वेगळे राहत असल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement
0