आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवनेरीच्या प्रतिकृतीचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणावर भाष्य करण्यास नकार देत, जनतेला महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण, जाताना हिंदुत्वाच्या वाटेवर निघालेल्या राज ठाकरेंना जोरदार टोला हाणला. ते म्हणाले -'मला भगव्या शालीची गरज नाही. मला जे काही बोलायचे आहे ते 14 तारखेच्या सभेत बोलेल.'
यावेळी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते मंत्री आदित्य ठाकरे, अनिल परब, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आदी नेते उपस्थित होते. यावेळी केलेल्या छोटेखाणी भाषणात त्यांनी जनतेला महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री म्हणाले -'महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा. गत अनेक दिवसांपासून मुंबई विमानतळावर शिवनेरीची प्रतिकृती तयार करण्याचे आपले स्वप्न होते. ते आज पूर्ण झाले. मला खूप काही बोलायचे आहे. अनेक विषयांवर मते मांडायची आहेत. पण, त्यावर बोलण्याचे हे व्यासपीठ नाही. मला जे काही बोलायचे आहे ते 14 तारखेच्या बीकेसीवरील सभेत बोलेन.' एवढे बोलून उद्धव पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
राज ठाकरेंचा काढला चिमटा
सध्या राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या मार्गावरील वाटचालीची जोरदार चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी त्यांना जोरदार टोला हाणला. ते म्हणाले -'अरविंदजी आपण सत्कारावेळी मला भगवी शाल द्याल असे वाटले होते. पण, मला त्या शालीची गरज नाही.'
जनतेला राज ठाकरेंचे माकडचाळे समजतात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजप व राज ठाकरेंवर कडाडून टीका केली. ते म्हणाले -आम्हाला कुणीही हिंदुत्व शिकवू नये. आमचे हिंदुत्व गदाधारी आहे, असे ते भाजपला उद्देशून म्हणाले. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंकडे मोर्चा वळवला. राज ठाकरेंनी अगोदर मराठी व नंतर हिंदुत्वाच्या नावाने राजकारण केले. त्यांचे माकडचाळे लोकांना चांगलेच समजतात. जनता मूर्ख नाही, असे उद्धव म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.