आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Devotees Are Not Allowed To Take Unlicensed Photos In Tulja Bhavani Temple; News And Live Updates

तुळजापूर:तुळजाभवानी मंदिरामध्ये विनापरवाना फोटो काढण्यास, चित्रीकरणास भाविकांना मनाई; मंदिर संस्थानने मंदिरातील सुरक्षा कंपनीस पत्र पाठविले

तुळजापूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सामान्यांना बंदी तरीही फोटो, चित्रीकरण व्हायरल

तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील शेकडो फोटो तसेच चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने अखेर मंदिर संस्थानने तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात विना परवाना फोटो काढणे तसेच चित्रीकरण करण्यास मनाई केली आहे. यासंदर्भातील निर्देश बुधवारी (दि.९) सुरक्षा कंपनी बी.व्ही.जी.ला दिले आहेत. दरम्यान, मंदिरात फोटो आणि चित्रीकरण करण्यास सामान्यांना बंदी असताना ही तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गाभाऱ्यातील फोटो, चित्रीकरण व्हायरल होतातच कसे, असा सवाल विचारण्यात येत आहे.

तुळजाभवानी मातेच्या मंदिरात विना परवाना फोटो काढणे तसेच चित्रीकरण करण्यास बंदी आहे. मात्र असे असतानाही सदर आदेशाचे उल्लंघन करत दररोज तुळजाभवानी मातेचा गाभाऱ्यातील तसेच मंदिरातील शेकडो फोटो तसेच चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील फोटो तसेच चित्रीकरणाचा दुरूपयोग होत असल्याने अखेर मंदिर संस्थानने मंदिरातील सुरक्षा कंपनी बीव्हीजीला पत्र दिले असून, या पत्राद्वारे तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात विना परवाना फोटो काढणे तसेच चित्रीकरण करण्यास मनाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

तशा आशयाची नोटीस तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गाभाऱ्यात डकवण्यात आली आहे. यानंतर तरी मंदिरातील फोटो आणि चित्रीकरण थांबेल अशी अपेक्षा सामान्य भाविक भक्तातून व्यक्त करण्यात येत आहे. तुळजाभवानी मातेचे फोटो मंदिर संस्थानच्या संकेत स्थळावरून घ्यावेत. मंदिरात फोटो काढायचे असतील किंवा चित्रीकरण करायचे असेल तर मंदिर संस्थानची रितसर परवानगी घेणे आवश्यक असणार आहे.

मंदिर परिसरातील सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही काय कामाचे ?
मंदिर परिसरात सामान्य भाविक फोटो काढत असेल तर लगेच सुरक्षारक्षक भाविकांना रोखतात, मोबाइल हिसकावून घेत फोटो डिलीट करतात. मात्र त्याचवेळी गाभाऱ्यात फोटो काढताना तसेच चित्रीकरण करण्यात येत असताना मंदिरातील सुरक्षारक्षक डोळेझाक का करतात, मंदिरात शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही मंदिर संस्थान कारवाई करण्यात टाळाटाळ का करते, हे न उलगडणारे कोडे आहे.

सामान्यांना बंदी तरीही फोटो, चित्रीकरण व्हायरल
मंदिरात फोटो आणि चित्रीकरण करण्यास सामान्यांना बंदी असताना ही गाभाऱ्यातले फोटो तसेच चित्रीकरण सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटो आणि चित्रीकरणामुळे काही वादग्रस्त विषय चव्हाट्यावर आल्याने तणाव निर्माण होत आहे. विशेषतः लाॅकडाऊनमध्ये मंदिर बंद असतानाही मंदिरातील चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...