आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनांचे केले लक्ष्मीपूजन:वाशीममध्ये ‘चालत्या-बोलत्या’ महालक्ष्मींची केली स्थापना; सिंधुबाई सोनुनेंचा प्रेरणादायी उपक्रम

वाशीम5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवादरम्यान, सर्वत्र जरीची वस्त्रे नेसून महालक्ष्मीची स्थापना केली गेली. असे असताना सासूने आपल्या सुनांंना लक्ष्मीच्या रूपात विराजमान करून त्यांची मनोभावे पूजाअर्चा केली आणि समाजासमोर एक वेगळा प्रेरणादायी आदर्श वाशीम येथील ड्रिमलँड सिटीमध्ये वास्तव्यास असलेल्या सासू सिंधुबाई सुभाष सोनुने यांनी निर्माण केला आहे.

सासू-सुनेचे नाते हे विळ्या भोपळ्याचे असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते. सासूंकडून सुनांवर अत्याचार होत आहेत. तर काही सासू आपल्या सुनांना मुलीप्रमाणे वागवत असल्याचीही उदाहरणे आहेत. मात्र, याहीपुढे जाऊन वाशीम शहरातील ड्रिम लॅन्ड सिटी या कॉलनीत राहणाऱ्या सिंधुबाई सुभाष सोनुने यांनी रेखा सचिन सोनुने व पल्लवी प्रमोद सोनुने या दोन्ही सुनबाईंना गौरी सणानिमित्त सजवलेल्या मंदिरात महालक्ष्मीपदी विराजमान केले. तर चि. मंधीर, रंधीर सोनुने यांना नारोबाच्या रूपात विराजमान केले.

दोन्ही लक्ष्मींना भरजरी साड्या व दागिन्यांनी सजवण्यात आले. त्यांचे पूजन व आरती करून त्यांना सासुबाईंच्या हस्ते जेवण भरवण्यात आले. तसेच घरातील सर्व सदस्यांनी त्यांचे दर्शन घेतले. या अनोख्या सन्मानाने दोन्हीही जावांचे डोळे आनंदाने डबडबून गेले होते. हा आगळावेगळा गौरीपूजनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी शहरातील नागरिकांसह खास करून महिलांनी गर्दी केली होती. सिंधुताई सोनुने व कुटुंबाने १० रोजी गणेश चतुर्थीनिमित्त गणेश मूर्तीची स्थापना न करता आपल्या घरातील नातू चि. मंधीर प्रमोद सोनुने व रंधीर सचिन सोनुने यांना गणेशाचा दर्जा देऊन त्यांची दररोज पूजाअर्चा केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...