आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामूहिक नमाज:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणींसह 125 जणांवर गुन्हा दाखल

परभणीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाथरीत संचारबंदी व जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करून संचारबंदी व जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल पाथरी पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी, तरबेज खान रहेमान खान दुर्राणी, तारेख खान अब्दुल्ला खान दुर्राणी यांच्यासह एकूण १२५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ईदची नमाज घरातच अदा करावी, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात हाेते. घरासमोरील मोकळ्या जागेत, सार्वजनिक ठिकाणी प्रार्थनेस मनाई केली हाेती. मात्र पाथरीत सामूहिक नमाज पठण केल्याने संसर्गाची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे रविवारी सार्वजनिक ठिकाणी सामूहिक, धार्मिक नमाज पठण केल्याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...