आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Hingoli News | After His Wife's Suicide, His Husband Also Ended His Life By Hanging Himself

धक्कादायक:पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीनेही गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा, हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील घटना

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथे पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी पोतरा शिवारात पतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. भीमराव घोगरे असे मृताचे नाव असल्याचे आखाडा बाळापुर पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथे भीमराव घोगरे व त्यांची पत्नी काजल घोगरे हे दोघे मजुरी करून उदरनिर्वाह करतात. तीन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. दररोज रोज मजुरी करून त्यांचा संसाराचा गाडा सुरू होता.

दरम्यान, गुरुवारी ता. 4 सकाळी नऊ वाजता काजल घोगरे ( 20 ) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांचा भाऊ शेषराव मेटकर (रा. राजगड तांडा जि. नांदेड ) यांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अर्ज दाखल दिला. यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली वसमतचे उपाधीक्षक किशोर कांबळे, आखाडा बाळापुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, पोलीस उपनिरीक्षक बी.बी. पुंड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या घटनेनंतर मृत काजल यांचे पती भीमराव घोगरे बेपत्ता झाले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास पोतरा शिवारामध्ये भीमराव घोगरे यांचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी मृत भीमराव यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात आणल्याचे पोलिसांनी सांगितले . याप्रकरणी अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद झाली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले

बातम्या आणखी आहेत...