आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Hingoli News | Punitive Action Against Officers And Employees Who Come Without Mask

हिंगोली:जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालयांमध्ये विनामास्क येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई, सीईओंचे आदेश

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालयांमधून विनामास्क येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी दिले आहेत. यामध्ये पहिल्या वेळी 100 तर दुसऱ्या वेळी 200 रुपये दंड आकारण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यात कोविडची परिस्थिती नियंत्रणात असल्याने शासकिय, निमशासकिय कार्यालयांमधून नागरीकांची गर्दी वाढू लागली आहे. शहरासह ग्रामीण भागातील गावकरी कामाच्या निमित्ताने शासकिय कार्यालयात येत आहेत. त्यामुळे मागील दोन वर्षाxपासून तुरळक गर्दी असलेल्या कार्यालयांमधून आता कामासाठी येणाऱ्या नागरीकांसोबतच राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा राबता वाढू लागला आहे. कोविडच्या रुग्णांची संख्या बोटावर मोजण्या एवढी असली तरी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे.

दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश

दरम्यान, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालयांमधूनही काही अधिकारी व कर्मचारी मास्कचा वापर करीत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी विनामास्क कार्यालयात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसह तालुकास्तरीय कार्यालयांचाही समावेश आहे.

कार्यालयात विनामास्क येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पहिल्या वेळी 100 रुपये तर दुसऱ्यावेळी 200 रुपये दंड आकारण्याच्या सुचना दिल्या आहेत. या शिवाय संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सुचनाही दैने यांनी दिल्या आहेत. या संदर्भात दैने यांनी सर्व विभाग प्रमुखांना पत्र पाठवून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होईल याची दक्षता घेण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. तर याबबाबतची जबाबदारही विभाग प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यकार्यकारी दैने यांच्या या निर्णयामुळे आता जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालयांमधून विना मास्क काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...