आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कोरोना पॉझीटिव्ह, सर्व संपर्क तपासणार, अधिकाऱ्यांचे स्वॅब नमुने तपासणीला घेणार

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वतःच क्वारंटाईन होण्याच्या सुचना दिल्या : धनवंत माळी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी

हिंगोली जिल्हा परिषदेचेे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल रविवारी ता. १ शासकिय रुग्णालयास प्राप्त झाला असून त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले जाणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपुर्वीच झालेल्या बदल्यांच्या डेमोमध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने देखील घेतले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत असून जिल्हा परिषदेमध्ये यापुर्वी कोरोनाचा शिरकाव झाला होता. आरोग्य विभागाचे पाच कर्मचारी कोरोनाबाधीत असल्याचे स्पष्ट झाल्या नंतर जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्यांची सर्वांचेचे थर्मल गन द्वारे तापमान तपासून तसेच सॅनेटायझर हातावर देऊनच त्यांना जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश दिला जाऊ लागला होता. त्यानंतरही जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्यांची संख्याही कायम होती.

दरम्यान, दोन दिवसांपुर्वीच मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सभागृहात उपस्थित राहून बदल्यांच्या प्रक्रियेची माहिती घेतली होती. त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या ग्रामसेवकाचा सत्कार व प्रमाणपत्र देखील त्यांच्या हस्ते देण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमांना विविध विभागांचे प्रमुख हजर होते. त्यानंतर शर्मा यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब नमुने आज तपासणीसाठी घेतले जाणार आहेत.

स्वतःच क्वारंटाईन होण्याच्या सुचना दिल्या : धनवंत माळी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर आता सर्व विभाग प्रमुखांना स्वस्तःच क्वारंटाईन होण्याचे कळविण्यात आले आहे. या शिवाय काही कर्मचाऱ्यांना देखील क्वारंटाईनबाबत सुचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाच्या बाबतीचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...