आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तळोदा:बायपास रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या भरवाड वस्तीला भीषण आग, आगीत पिडीत कुटुंबाचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक

तळोदाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

तळोदा येथील खर्डी नदीत पडलेल्या कचर्‍याला आग लावल्यामुळे याच आगीमुळे शेजारीच राहणार्‍या भरवाड बांधवांच्या पाच घराला आग लागली. या आगीत भरवाड कुटुंबाचे सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे

तळोदा शहराबाहेरील अंकलेश्वर बर्‍हाणपूर महामार्गा जवळ राहणारे रेवा हरि भरवाड, तेजा हरि भरवाड हमीर हरी भरवाड,  रणछोड रेवा भरवाड, व  दाना रेवा भरवाड आदी ५ कुटुंबाच्या घराला दुपारी १ वाजेचा सुमारास अचानक आग लागल्याचे दिसताच वालाभाई भरवाड , विकास मगरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला व महावितारण कार्यालयाला कळवले यावेळी जळीत घरातील पुरूष व महिला भगिनी घरातून बाहेर निघून आपला जीव वाचवतांना दिसत होते. तर, काही बांधव घरातील साहित्य बाहेर काढत होते.

विशेष म्हणजे घरात ज्वारी करबाड व कुटार असल्यामुळे आगीने जास्तच पेट घेतला. यावेळी या भरवाड कुटुंबाचे सोन्या चांदीचे दागिने, कपडेलत्ते, पशुखाद्य, अन्यधान्य व रोख कँश अश्या स्वरूपात एकूण ९ ते १० लाखाचे नुकसान झाल्याची घटनास्थळी माहिती मिळाली आहे.

विशेष म्हणजे यावेळी शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी व सेवाभावी नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण अाणण्याचा प्रयत्न करून पिडीत कुटुंबाचे स्वात्वन केले आहे.

यावेळी आमदार राजेश पाडवी, भाजपा शहर अध्यक्ष योगेश चौधरी, नंदुरबार जिल्हा युवा काँग्रेसचे संदिप परदेशी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रीय , माजी नगरसेवक पंकज राणे ,जयेश सुर्यवंशी शिवसेना उपशहरप्रमुख आदी घटनास्थळी उपस्थित होते. या वेळी नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने अग्निशमन दलाचे वाहनदेखील माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे यांच्यामुळे धावून आले होते,

बातम्या आणखी आहेत...