आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Local News | Promotion Of 64 Employees Of Hingoli District Police Force

हिंगोली:जिल्हा पोलिस दलातील 64 कर्मचाऱ्यांना पदोन्नती, पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची दिवाळी भेट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील 64 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शुक्रवारी काढले आहेत. पोलिस अधीक्षकांनी कर्मचाऱ्यांना दिलेली पदोन्नती दिवाळी भेट असल्याचे बोलले जात आहे.

हिंगोली जिल्ह्यात पोलिस दलात मागील काही दिवसापासून कर्मचाऱ्यांची पदोन्नतीने भरली जाणारी पदे रिक्त होती. मात्र कोरोना बंदोबस्त तसेच सण उत्सवाच्या बंदोबस्तामुळे पदोन्नतीचे काम संथ गतीने सुरू होते. मात्र आता दिवाळीत बंदोबस्ताचा ताण कमी असल्यामुळे पोलिस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी पदोन्नतीसाठी पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पोलिस अधीक्षक कलासागर, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यातिष देशमुख यांनी पदोन्नतीच्या हालचाली सुरू केल्या. त्यानुसार पात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून बिंदूनामावली तपासूनच या कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील 64 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून यामध्ये 16 पोलिस जमादार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. तसेच 30 पोलिस नाईक यांना पोलिस हवालदार पदावर तर 28 पोलिस शिपाई यांना पोलिस नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. शुक्रवारी पोलिस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. दिवाळीच्या सणांमध्येच कर्मचाऱ्यांना मिळालेली पदोन्नती दिवाळी भेट असल्याचे मानले जात असून पदोन्नतीमुळे कर्मचाऱ्यांमधूनही समाधान व्यक्त होऊ लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...