आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • 'Magnet Man' In Wadwani Taluka Too; Doctors Say The Vaccine Does Not Cause Magnetic Force; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:वडवणी तालुक्यातही ‘मॅग्नेट मॅन’; लसीमुळे चुंबकीय शक्ती येत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे

वडवणीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लस घेतल्यामुळे अंगात कोणतीही चुंबकीय शक्ती येत नाही.

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर अंगाला धातूच्या वस्तू चिकटत असल्याची घटना नाशिकमध्ये समोर आल्यानंतर असाच प्रकार बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातही शुक्रवारी समोर आला. वीज खात्यातून निवृत्त झालेले हरिभाऊ वडचकर यांनी आपल्या अंगाला अशा प्रकारे वस्तू चिकटत असल्याचा दावा केला आहे. त्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुप्पा (ता. वडवणी) येथील रहिवासी असलेल्या हरिभाऊ वडचकर यांनी माहितीनुसार, त्यांनी मंगळवारी (दि.८) कोविशील्ड लसीचा दुसरा डोस घेतला.

गुरुवारी (दि.१०) शर्टच्या खिशातील चिल्लर नाणी अंगाला चिकटत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. नाशिकमधील प्रकारासारखा हा प्रकार असल्याचे त्यांना जाणवले म्हणून त्यांनी घरातील स्टीलच्या इतर वस्तू अंगाला चिकटतात का, याची पाहणी केली तर इतर वस्तूही चिकटत असल्याचे लक्षात आले. काही वेळातच परिसरात ही बातमी पसरली, त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांना फोनही सुरू झाले. आता हा प्रकार पाहण्यासाठी त्यांच्या घरी परिसरातील नागरिक गर्दी करू लागले आहेत. दरम्यान, तपासणीसाठी त्यांना आरोग्य विभागाने कुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.

प्रकार अवैज्ञानिक
अंगाला वस्तू चिकटणे यात कुठलाही चमत्कार नाही किंवा कोविड लस घेतल्यामुळे असा प्रकार होती हेही चूक आहे.अवैज्ञानिक आहे. अंग घामेजले असेल, वस्तू ओली असेल तर हवेची पोकळी तयार होऊन अशा वस्तू चिकटतात. - अशोक तांगडे , सामाजिक कार्यकर्ते, अंनिस कार्यकर्ते

लसीमुळे असे होत नाही
लस घेतल्यामुळे अंगात कोणतीही चुंबकीय शक्ती येत नाही. हरिभाऊ यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. त्यांची तपासणी करून अहवाल पाठवला जाईल. डॉ. डी. ए. ठोकरे, वैद्यकीय अधिकारी, कुप्पा.

बातम्या आणखी आहेत...