आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भर पावसात मालेगाव-बडोदा मार्गावर बस उलटली, अनेक प्रवाशी जखमी; चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात

नवापुरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवापुर-पिंपळनेर रस्त्यावरील रायपूर गावाच्या नदीजवळ मालेगाव-बडोदा बसचा अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नदीजवळ पलटी झाली. दरम्यान, या घटनेत आणखी 10-15 पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. नवापूर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी 11 वाजेच्या सुमारास मालेगावहून बडोदा कडे जाणारी बस क्रमांक (GJ 18 Z 6858) रायपूर नदीत जवळ रस्त्याच्या बाजूला पलटी झाली.

बसमधील प्रवाशांना बसचा पुढील काच फोडून बाहेर काढण्यात आले. यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. अपघातग्रस्तांना परिसरातील नागरिकांनी आपल्या खाजगी वाहनाने उपचारासाठी दाखल केले. उर्वरित प्रवाशांना महाराष्ट्र परिवहन विभागाच्या बसने नवापुर बस स्थानकावर रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक नासीर पठाण, विक्की वाघ यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. नवापूर पिंपळनेर मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. नवापूर कृषी विभागातील कर्मचारी योगेश भामरे यांचे कुटुंब अपघात जखमी झाले आहे.

या उपघातात योगेश भामरे वय 39 यशश्री भामरे वय 9 बापलेकीला डोक्यात मार लागला आहे. तर ज्योती भामरे वय 31 किरकोळ जखमी आहे.त्याचावर नवापूर शिवशांती एक्सीडेंट रुग्णालयात उपचार सुरू आहे. ते बसने पिंपळनेरहून नवापूर येत होते. नवापूर पिंपळनेर रस्ता अरुंद असल्याने येथे नेहमी अपघात होत असतात या रस्त्याचे रुंदीकरण करावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...