आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • NEET Exam Result | Hingoli Vineet Mundada Scored 702 Marks In The Exam

NEET परिक्षेचा रिझल्ट:विनीत मुंदडाने नीट परिक्षेत मिळविले 702 मार्क, देशात 60 वा क्रमांक पटकावत पहिल्या 100 मध्ये येणारा हिंगोलीचा पहिलाच विद्यार्थी

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील विनीत मुरलीधर मुंदडा याने नीट परिक्षेत 720 पैकी 702 गुण मिळविले आहे. तर देशात 60 वा क्रमांक मिळविला आहे. देशात पहिल्या शंभरामध्ये येणारा विनीत हिंगोलीचा पहिलाच विद्यार्थी आहे. कार्डीयॉलॉजीमध्ये उच्च शिक्षण घेऊन जिल्ह्यातील हृदय रुग्णांची सेवा करण्याचा मानस त्याने बोलून दाखविला आहे.

हिंगोली येथील विनीत मुंदडा यांचे प्राथमिक शिक्षण हिंगोलीतच पूर्ण झाले. बहिण राधिका मुंदडा बीडएसचे शिक्षण घेत असल्याने त्यालाही वैद्यकिय शिक्षणाची आवड निर्माण झाली. त्यासाठी इयत्ता सातवी पासूनच तयारी सुरु केली. कोटा राजस्थान येथे त्याने शिकवणीही केली. नीट परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन देशातील नामांकित वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी त्याने तयारी चालवली होती. त्यासाठी दररोज किमान 12 ते 15 तास अभ्यास केला.

दरम्यान, त्याच्या यशाबद्दल विठ्ठलदास मुंदडा, मुरलीधर मुंदडा, ॲड. मनीष साकळे, भरत चौधरी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनीष आखरे, कुलदीप मास्ट, सुरेश बांगर, नगरसेवक अमेर अली, राजेश जयस्वाल, ॲड. गडदे, पवन मुंदडा, उर्मीला मुंदडा, तेजस मुंदडा, सीमा मुंदडा यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...