आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक प्रकार:प्रियकराच्या मदतीने पतीला बुडवून मारले अन् आत्महत्या केल्याचे भासवले; पत्नी व मुलासह प्रियकरावर गुन्हा केला दाखल

कळंब3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोन रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचे

एका विवाहितेने प्रियकराच्या मदतीने बसचालक पतीला विहिरीत बुडवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात सुरुवातीला बसचालकाने आत्महत्या केल्याचे भासवण्यात आले. २० मे रोजी खून झाला होता. न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. भीमराव रंगनाथ खराटे (५२, रा. भोगजी, ता. कळंब) हे कळंब येथे बसचालक होते. मांगवडगाव (ता. केज) शिवारातील धनराज थोरात यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्या वेळी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. मात्र तीन महिन्यांनंतर प्रकरणाचा उलगडा झाला.

प्रेमप्रकरणात अडसर ठरत असल्याने तसेच अनुकंपा तत्त्वावर मुलाला नोकरी लावण्यासाठी रंगनाथ खराटे यांचा सिनेस्टाइल काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी भीमराव यांचे बंधू बालाजी खराटे यांचा पत्नी, मुलगा व प्रियकर यांच्यावर संशय होता. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता म्हणून बालाजी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी ११ सप्टेंबर रोजी न्यायालयीन आदेशावरून पत्नी राधाबाई भीमराव खराटे (४८), प्रियकर महादेव ऊर्फ बबन अच्युत खराटे (४०) मुलगा सिद्धेश्वर भीमराव खराटे (२८, सर्व रा. भोगजी, ता. कळंब) यांच्याविरोधात युसूफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणातील तिन्ही आरोपी फरार झाले आहेत.

फोन रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचे
घटना उघडकीस आणण्यासाठी फिर्यादी बालाजी खराटे यांनी काही फोन रेकॉर्डिंग, कळंब शहरातील परळी रोडवरील काही हॉटेल आणि दुकानातील सीसीटीव्ही फुटेज कोर्टात जमा केले. ज्यात नमूद तारखेला भीमराव, आरोपी राधाबाई आणि महादेव एका दुचाकीवर जाताना दिसले. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...