आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Shiv Sena MP Sanjay Raut Said If We Do Not Take The Lead In The Municipal Elections; News And Live Updates

सूतोवाच:​​​​​​​मनपा निवडणुकीत आघाडी न झाल्यास स्वबळावर लढू; शिवसेना खासदार संजय राऊत यांचे प्रतिपादन

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद यांच्यावर आरोप करण्याची सध्या फॅशन झाली आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची स्वतंत्रपणे लढण्याची तयारी झाली आहे. त्याच वेळी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातूनही निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असे सूतोवाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केले. पुण्यात शिवसेनेला ८० जागांवर विजय मिळेल, असा दावा करून यासाठीची तयारी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही शनिवारी आढावा बैठक घेतली, तर राज्यातील ॲनलॉक आणि लॉकबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होता. सरकारमध्ये याबाबत समन्वय नाही का, असा सवाल उपस्थित केला असता ते म्हणाले, चुका या होत असतात. त्यामुळे सर्व काही चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही.

खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यानंतर पोखरकरांविरोधात बंड करणारे काही सदस्य सहलीवर गेले. या सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांची फूस असल्याचा शिवसेनेचा दावा आहे. शिवसेनेचे माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. याबाबत माहिती देताना राऊत म्हणाले, ‘खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत दिलीप मोहिते. त्यांनी घडवून आणलेला हा विषय आहे. मात्र, त्यांनी जरी घडवून आणलेला हा विषय होता तरी या जिल्ह्याचे, या भागाचे महत्त्वाचे नेते म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की, अजित पवार यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे.

स्थानिक पातळीवर राजकारण होत असतं, कुरघोड्या करत असतात. पण त्या कोणत्या स्तरापर्यंत आपण करू शकतो हे ठरवायला हवं. त्यामुळे आता आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही स्वबळावर आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून तयारी केली आहे.सत्ता असेल किंवा नसेल याच्याशी काही आम्हाला पडलेलं नाही. तीन पक्षाचे सरकार एकमेकांचे मतभेद बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर एकत्र आले आहे, असेही राऊत यांनी या वेळी बोलताना स्पष्टपणे सांगितले.

शरद पवारांवर आरोप करण्याची सध्या फॅशन
खासदार राऊत म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी आम्ही काही करत नाही असे भाजपला वाटेत असेल तर त्यांनी केंद्र सरकारला सांगून आरक्षण प्रश्न सोडवावा. राज्य म्हणून आम्ही सर्व सहकार्य करू. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर त्यांनी सांगितले की, चंद्रकांत पाटील म्हणजे वसंतदादा पाटील नाहीत. विरोधी पक्षाचे प्रमुख हे जबाबदार पद असते आणि त्यावरील व्यक्तीने कोणतेही वक्तव्य करताना भान बाळगले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद यांच्यावर आरोप करण्याची सध्या फॅशन झाली आहे. कारण, त्याशिवाय बातम्या होऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...