आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोणाचे विघ्न:सोशल डिस्टंसिंगचे निमय पाळून पाच जणांच्या साक्षीने केले लग्न   

वर्धा 3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • वर्धा : सोशल डिस्टंसिंगचे निमय पाळून लग्न

कोरोनाचा हाहा:कार सुरू असल्याचे सर्वांच धास्ती भरली आहेत.लॉकडाऊन असल्यामुळे अनेक विवाह सोहळे रद्द करण्यात आले मात्र देवळी तालुक्यातील अंदोरी येथील मुलीच्या वडिलांनी कोरोणाचे विघ्न असूनही  सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून पाच जणांच्या साक्षीने मुलीचे लग्न करण्यात आले आहे. देवळी तालुक्यातील अंदोरी येथील शंकर नान्हे यांची मुलगी पूजा हिचा विवाह सेलसुरा येथील रहिवासी असलेले कैलाश पाचारे यांचा मुलगा दिनेश यांच्यासोबत दिनांक ६ एप्रिल रोजी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. देशात कोरोना विषाणू आजाराने हाहा:कार केला असल्याने देशात लॉकडाऊन करण्यात आले. जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून,सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जावे याकरिता प्रशासनाकडून कठोर अंमलबजावणी सुरु होती. पचारे व  नान्हे या दोघाही कुटुंबातील सदस्यांना विवाह सोहळा कसा साजरा करावा हीच चिंता सतावत होती.मुलीचे वडील शंकर पचारे यांनी दिनांक ६ एप्रिल रोजी विवाह सोहळा असल्याची माहिती गावातील पोलीस पाटील हेमंत ढोले यांना देण्यात आली.पोलिस पाटील यांनी गावातील विवाह सोहळा असल्याची माहिती देवळी येथील पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना दिली.पोलीस निरीक्षक यांनी विवाह सोहळ्याची जबाबदारी उप पोलीस निरीक्षक अरविंद शिंदे यांना दिली.या दोघांच्या मदतीने पूजा व दिनेश दोघांचीही लग्न गाठ बांधण्यात आली.कोरोनाचे विघ्न देशात आहेत. कोरोनाचे विघ्न दूर करीत पूजा व दिनेश यांनी आई- वडील,पोलीस पाटील हेमंत ढोले, सरपंच जयकुमार वाकडे, सचिन कुराडकर व पोलीस उप निरीक्षक यांच्या साक्षीने सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून लग्न केले.पोलीस पाटील व उप पोलीस निरीक्षक यांच्या मदतीने विवाह झाला असल्याचे नान्हे ब पचारे कुटूंबियांकडून सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...