आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Solapur News | A Young Man Was Killed On The Spot In A Horrific Car And Two wheeler Accident In Solapur

सोलापूर:कार-दुचाकीच्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार, दोघे गंभीर; दिवाळी पाडव्याच्या दिवशी त्याच रस्त्यावर दोन अपघात

अक्कलकोटएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ जवळ कुंभार यांच्या शेताजवळील वळणावर कार व दुचाकीच्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहे. सिद्धाराम भिमाशंकर कोळी (वय 28 रा सदलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत सिद्धाराम कोळी हा सकाळी 11 वाजता त्याच्या मुलीचे जावळं काढण्यासाठी राजकुमार भोसगी व गजानन मुलगे दोघे राहणार सदलापूर या दोन्ही मित्रासोबत एकाच दुचाकीवरून वागदरी ता. अक्कलकोट येथे गेले होते. जावळं कार्यक्रम उरकून गावाकडे परतत असताना कुंभार यांच्या शेताजवळील वळणावर समोरून येणाऱ्या भरदाव चार चाकी महिंद्रा कारने समोरून दुचाकीस्वारांना जोरात धक्का दिला. यामुळे दुचाकीवरील तिघे तरुण गंभीर जखमी झाले. त्यापैकी मृत सिद्धाराम कोळी यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले राजकुमार भोसगी याच्या पायाला गंभीर दुखापत तर गजानन मुलगे याच्या हाताला गंभीर मार लागला असून दोघांना सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. या अपघातात दुचाकी व चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून कार मधील 4 जण जखमी झाले आहेत. कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

6 वर्षीय चिमुकलीनेही अपघातात प्राण गमावले

याच रस्त्यावर दुपारी 1 च्या सुमारास अपघातात 6 वर्षीय चिमुकलीने प्राण गमावले आहे. त्यानंतर सायंकाळी हा दुसरा अपघात झाला असून यामध्ये ही एक तरुणाने प्राण गमावले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची फिर्याद मोठा भाऊ मल्लिकार्जुन कोळी यांनी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...