आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Statement Of The Student Committee To The Divisional Commissioner For Announce MPSC Exam Dates; News And Live Updates

राज्य सेवा परीक्षा:​​​​​​​एमपीएससी परीक्षेच्या तारखा जाहीर करा; विद्यार्थी समितीचे विभागीय आयुक्तांना निवेदन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सेवा परीक्षेच्या कम्बाईन गट व पूर्व परीक्षाची तारीख जाहीर करावी, ‘गट क’ची जाहीरात काढून परीक्षा घ्यावी आदी मागण्यासाठी विद्यार्थी समितीच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. राज्यात कोरोना महामारीमूळे गेल्या काही दिवसांपासून भरती प्रक्रिया रखडलेली आहे.

निवेदनानुसार, रखडलेली जिल्हा परिषद वर्ग 3, वर्ग 4 ची भरती प्रक्रिया पूर्ण करावी. राज्यातील 5 हजार 300 पदाची रखडलेली पोलिस भरती सुरू करावी, आरोग्य विभागाची रिक्त पदांची भरती घेण्यात यावी, एमपीएससीच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल लावून तत्काळ नियुक्त्या करून घ्याव्यात अशी मागणी या निवेदनात करण्यात आली होती.

त्यासोबतच पोलिस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी पूर्ववत करावी, 2019 मध्ये झालेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी जाहीर करावी, शिक्षक सेवक पदाची भरती प्रक्रिया पूर्ण करावी, वर्ग 3, वर्ग 4 ची परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात यावी आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या होत्या. यावेळी अभिषेक हाराळ, गजानन पालवे, शेख इम्रान, अमोल कापरे, संजय जिवढे, ऋषिकेश पठाडे, राजू ताटीकुंडलवार, ज्ञानेश्वर जाधव आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...