आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • The Proposals Students Due To Lost Parents In Corona Pendamic News And Live Updates

कोरोना महामारी:कोरानामुळे पालक गमावलेल्या विभागातील 1,487 विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शिक्षण संचालनालयास सादर; अनाथ मुलांचे शालेय शुल्क माफ

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • विभागातील जिल्हानिहाय मुलांची संख्या

कोरोना व इतर कारणांमुळे पालकांचे छत्र हरपलेल्या मुलांचे नुकतेच सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात औरंगाबाद विभागातून एकूण 1 हजार 487 विद्यार्थी आढळून आले आहेत. पहिली ते बारावीतील ही विद्यार्थी संख्या असून, त्यांचे प्रस्ताव निर्देशानुसार शिक्षण संचालनालयास पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. सरकारने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या मुलांची माहिती कळविण्याचे आदेश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाने 27 जुलै रोजी दिलेल्या आदेशानुसार, सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळेमधील मार्च 2020 नंतर कोविडमुळे अथवा इतर कारणांमुळे आई-वडील अथवा दोन्हीही पालक गमावल्याने अंशतः किंवा पूर्णतः निराधार झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण खासगी अथवा शासकीय शाळेमध्ये नियमित सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी शाळांमधील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्याची माहिती संकलित करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. ती माहिती शिक्षण संचालनालयाकडे सादर करण्यात आली आहे.

औरंगाबाद विभागातील जालना, परभणी, औरंगाबाद, बीड आणि हिंगोली अशा पाच जिल्ह्यातून एकूण 1 हजार 487 मुलांनी आई, वडील अथवा दोन्ही पालकत्व गमावले आहेत. तर शून्य ते सहा वयोगटातील माहिती महिला व बालकल्याण विभागामार्फत शासनाला कळविण्यात येत आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच कोरोनासह इतर आजारपण अथवा कोणत्याही कारणामुळे पालक गमवले असेल अशा मुलांची माहिती देखील शासनाने मागवली असल्याचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी सांगितले.

कोरोनाने अनाथ झालेल्या मुलांचे शालेय शुल्क माफ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोरोनाकाळात पालकांचे निधन झालेल्या अनाथ विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ करण्यात यावे, असे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.25) सर्व माध्यमाच्या विनाअनुदानित, कायम विनाअनुदानिक, स्वयंअर्थसहाय्यित खासगी शाळा, जिल्हा परिषदेच्या सर्व माध्यमांच्या शाळांचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांना दिले होते. यानुसार, औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढत कोरोनाकाळात अनाथ झालेल्या मुलांचे शालेय शुल्क माफ केले आहे. अनेक लोकांकडून वारंवार ही मागणी करण्यात येत होती. यामुळे अनाथ मुलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विभागातील जिल्हानिहाय मुलांची संख्या

 • औरंगाबाद - 273
 • जालना - 92
 • बीड - 632
 • परभणी - 317
 • हिंगोली - 173
 • एकूण 1,487
बातम्या आणखी आहेत...