आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:नांदेडात गुंड विकी चव्हाणची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

नांदेडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या जवळच असलेल्या गाडेगाव रस्त्यावर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गुंड विकी चव्हाणची (२९) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी मुंजाजी धोंगडे आणि सुशील डावखोरे या दोन जणांना अटक केली आहे. गुन्हेगारी क्षेत्रातील वैमनस्यातून हा खून झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रविवारी रात्री विकी आणि त्याचा एक मित्र मोटारसायकलवर गाडेगावच्या दिशेने जात होते. त्याच वेळी एका पांढऱ्या स्काॅर्पिआेमधून चार जण मागून आले व त्यांनी मोटारसायकलला धडक मारली. त्या धडकेत मोटारसायकलवरील दोघेही खाली पडले. त्या वेळी गाडीतून चार जण खाली उतरले. त्यांनी विकीवर पिस्तुलातून गाेळ्या झाडल्या. तसेच खंजिरानेही वार केले. त्यानंतर मारेकऱ्यांनी त्याला जखमी अवस्थेत गाडीत टाकले व त्याचे प्राण गेल्यानंतर मृतदेह हस्सापूर शिवारात टाकून दिला. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. विकी विरोधात लिंबगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, धोंगडे आणि डावखोर यांना ८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...