आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Villagers Who Were Out Of The House For The Morning Walk Were Beaten To Death, News And Live Updates

परभणी:मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या ग्रामस्थांवर काळाचा घाला, दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

परभणीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील केकरजवळा येथे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या ग्रामस्थांवर काळाने घाला घातल्याची घटना रविवार दि. 12 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. केकरजवळा गावातील चार ग्रामस्थ मॉर्निंग वॉक करत असताना एका अज्ञानात वाहनाने त्यांना चिरडले असून यात दोन जण जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, केकरजवळा येथील पोलिस पाटील उत्तमराव लाडाणे, आत्माराम लाडाणे, राधाकिशन लाडाणे, नंदकिशोर लाडाणे हे पहाटेच्या सुमारास गावाच्या परिसरात पाथरी पोखर्णी या रोडवर मॉर्निंग वॉक करत असताना एका अज्ञात वाहनाने या चारही जणाना धडक दिली.

यात केकरजवळा गावचे पोलीस पाटील उत्तमराव लाडाणे आणि आत्माराम लाडाणे यांचा जागीच मृत्यू झाला तर राधाकिशन लाडाणे आणि नंदकिशोर लाडाणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...