Home >> Magazine >> Akshara

Akshara

 • स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अजोड कार्याचा अविरत जागर करणार्या शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने दुसरे स्वा. सावरकर साहित्य संमेलन 10 फेब्रुवारी रोजी थेट र्शीलंकेत आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त :शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने पोर्टब्लेअरमध्ये मार्च 2010 मध्ये संघाचे संस्थापक कॅप्टन नीलेश गायकवाड यांनी स्वा. सावरकर मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. अंदमानच्या इतिहासात सावरकरांच्या साहित्यावरचा हा पहिलाच कार्यक्रम ठरला. या संमेलनास महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश,...
  January 25, 04:53 AM
 • असामान्य अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांची ओळख केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर होती. अशा अभिनेत्रीची आठवण म्हणून नागपूरचे गिरीश गांधींनी पुढाकार घेऊन स्मिता स्मृति हा अंक गेल्या चोवीस वर्षांपासून काढत आहेत. 2011 चा अंक आई या विषयाला वाहिलेला आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर या अंकाचे अतिथी संपादक आहेत. स्मिता स्मृति या वार्षिक अंकाची मांडणी महिलांच्या जीवनाशी संबंधित विषय घेऊन करण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानुसार हा अंकसुद्धा आई : एक समृद्ध आभाळ अशी...
  January 11, 08:06 AM
 • वाचनाचे वेड बालपणापासूनच लागले. वडिलांनी दररोज वाचनालयात जाऊन किमान दोन तास वृत्तपत्र वाचण्याची सवय लावली. यातूनच महत्त्वाच्या बातम्यांची टिपणे काढणे सुरू केले. अधिक माहितीसाठी मग पुस्तके वाचण्याची गरज पडायला लागली आणि अशा प्रकारे वाचनाची सवय वृद्धिंगत होत गेली ती आजही कायम आहे. बाबूराव अर्नाळकर, बाबा कदम आणि गुरुनाथ नाईक यांच्या रहस्यकथांपासून सुरू झालेला वाचन प्रवास खांडेकर, फडके, सावंत, देसाई, माडगूळकर व पुलंपासून फुले, शाहू, आंबेडकर, मार्क्स, गॉर्की, दोस्तोव्हस्की यांच्यापर्यंत...
  January 11, 08:02 AM
 • इ- संमेलन आपण घरबसल्या एन्जॉय करू शकणार आहोत कारण हे आगळेवेगळे साहित्य संमेलन चक्क कुठल्या विशिष्ट ठिकाणी न भरता संकेतस्थळावरच भरणार आहे आणि आपण फक्त त्या वेबसाइट क्लिक करायची आणि ई- साहित्य संमेलनाच्या वारीत सहभागी व्हायचे आहे.ही आगळीवेगळी संकल्पना गेल्या वर्षी युनिक फीचर्सच्या डॉ. सुहास कुलकर्णी आणि आनंद अवधानी यांनी मांडली होती. संमेलनात तरुणाईचा सहभाग दिवसेंदिवस उणावतो आहे, ही वस्तुस्थिती आहे. युवा मनांची नस ज्येष्ठ मान्यवर साहित्यिकांना सापडत नाही, असेही म्हटले जात आहे. तरुण...
  January 11, 07:59 AM
 • नाशिक शहर विकसित होत आहे याची लक्षणे गेल्या काही वर्षांपासून दिसायला लागली आहेत. ग्रंथयात्रेच्या बदललेल्या स्वरूपाने त्यात भर घातली. त्यातल्या त्यात साहित्यसंस्कृतीचा अभिजात वारसा कुसुमाग्रज-कानेटकरांनी नाशिककरांच्या हाती ठेवला आहे. तो जपण्याची पहिली पायरी म्हणजे वाचनसंस्कृती. ती जपण्याकरता इथे अनेकजण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. काहीजण या प्रयत्नांना चळवळीचे स्वरूप देतात तर काहीजण इव्हेंटचे. र्शीज्योतीतर्फे भरलेल्या ग्रंथयात्रेला इव्हेंट म्हणायचे की चळवळ हा फार मोठा...
  January 11, 07:55 AM
 • भारतरत्न भीमसेन हे पुस्तक या वर्षीच्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात प्रकाशित झाले. उत्कर्ष प्रकाशनतर्फे ते सविता जोशी यांनी प्रकाशित केले आहे. भीमसेनजींच्या निधनानंतर त्यांच्यासंबंधीच्या आठवणी, लेख, अनुभव, मैफली, प्रवास, अभ्यास, चिंतन हे सारे विविध माध्यमांतून कित्येक दिवस व्यक्त होत राहिले. त्यातील निवडक लेख संकलित करून तर काही लेखांचे संपादन करून पं. भीमसेनजींचे स्वरवैभव शब्दरूपात मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. हे संकलन व संपादन डॉ. सुरेश गरसोळे आणि मुक्ता...
  January 3, 09:03 PM
 • आदिवासींचा इतिहास, संस्कृती आणि साहित्यावर नेहमीच बोललं जातं. तथापि, आदिवासींचा कोणताही इतिहास लिखित स्वरूपात नाही. जे काही साहित्य उपलब्ध आहे, ते मौखिक वाङ्मयावर आधारित आहे. आदिवासींचा इतिहास लिहिण्याची जबाबदारी अभ्यासक, संशोधकांची असली तरी तो प्रकाशित करण्याचं काम शासनाने करावं. आदिवासी साहित्य हे बोलीभाषेतूनच लिहिलं जावं आणि या साहित्य प्रकाशनाला शासनाने पन्नास ते साठ टक्के अनुदान द्यावं. प्रकाशित होणा-या साहित्याची भाषिक व्यवस्था लावण्याचं काम अभ्यासक करतील. आदिवासी भाषेतील...
  January 3, 09:00 PM
 • डॉ. प्रकाश मोगले हे मराठवाड्यातील नव्या पिढीचे एक दमदार लेखक आहेत. विविध वाङ्मयीन नियतकालिकांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असते. समकालीन आंबेडकरवादी साहित्य : प्रवृत्ती आणि प्रदूषणे हे त्यांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले असून या पुस्तकात एकूण 22 लेखकांच्या लेखनकृतींची चर्चा, चिकित्सा केलेली आहे. त्यात डॉ. नरेंद्र जाधव यांचे आमचा बाप आन् आम्ही, डॉ. शरणकुमार लिंबाळेंचे अक्करमाशी, आणि नामदेव कांबळे यांची राघववेळ ही आत्मकथनात्मक कादंबरी आदी पुस्तके आंबेडकरवादी साहित्यात प्रदूषण निर्माण...
  January 3, 08:59 PM
 • मी उद्योग क्षेत्रात कार्यरत असलो तरी माझा आणि पुस्तकांचा खूप जुना संबध आहे. माझे वडील शिर्डीजवळील लक्ष्मीवाडी येथील सोमय्या साखर कारखान्यात नोकरी करायचे. या कारखान्यातच एक लहानसे वाचनालय होते. मी काही ना काही काम काढून या वाचनालयात जाऊ लागलो. तिथल्या ग्रंथपालाला पुस्तकांवर नावे टाकणे, त्यांना कव्हर लावणे, त्यांचा क्रम लावणे अशा कामात मदत करायचो. त्या बदल्यात मला वाचण्यासाठी पुस्तके मिळत असत. कारखान्याच्या वतीने काही कार्यक्रमांसाठी विख्यात लेखक गो. नी. दांडेकर, शं. ना. नवरे, नाटककार...
  January 3, 08:58 PM
 • दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, नजर में ख्वाबों की बिजलियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम . . . या ओळी आठवल्या की मध्यंतरी येऊन गेलेला जिंदगी ना मिलेगी दोबारा हा संवेदनशील चित्रपट आठवतो. या चित्रपटामुळे जावेद अख्तरमधील कवी नव्याने समोर आला. यानिमित्ताने चित्रपटात कवितेचा समावेश, किंबहुना कविता चित्रपटाचा मुख्य धागा बनू शकते हा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशात आला. एरवी कट्ट्यापुरती वा एखाद्या कविसंमेलनापुरतीच मर्यादित राहणारी कविता अशा कमर्शियल माध्यमामुळे...
  January 3, 08:57 PM
 • सन 1936 मध्ये पं. रघुनाथशास्त्री कोकजे यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकात शास्त्रीबुवांनी हिंदू धर्माकडे सामाजिक दृष्टिकोनातून काळाप्रमाणे परिवर्तनाचीही अपेक्षा केलेली आहे. 1936 असो किंवा 2011 - कोणत्याही धर्माची मूलभूत तत्त्वे माणूस व समाज यांच्या परस्पर संबंधावर आधारलेल्या दृष्टिकोनातून आलेली असतात.हिंदू धर्मावर चर्चा करताना बुद्धिवंतांनी काही वेळेस मांडलेली तर्ककठोर मते, त्यातूनच आपल्या धर्मावर केलेले प्रहार इत्यादी. यातूनच हिंदू धर्माबद्दल सकारात्मक दृष्टिकोन कसा रूढ होईल...
  December 21, 05:36 AM
 • विज्ञान शाखेचे विद्यार्थी साहित्याचे वाचन करत नाहीत, असे म्हटले जाते, पण मी यास अपवाद आहे. लहानपणी घरातच वाचनाची सवय लागली. वडील नियमितपणे चांदोबा, विक्रम वेताळ यासारखी पुस्तके आणायचे. शाळेतही सुसज्ज ग्रंथालय होते. तेथे साने गुरुजींचे श्यामची आई, महात्मा गांधींचे माझे सत्याचे प्रयोग यासोबतच स्वामी विवेकानंद, विनोबा भावे यांची पुस्तके वाचनात आली. दहावीनंतर पीयुसी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. त्याकाळी विज्ञान शाखेतही प्राचीन काव्य, अर्वाचिन साहित्य, वाड्मय यांचा अभ्यासक्रमात समावेश...
  December 21, 05:33 AM
 • उन्हातान्हाची, वादळवार्याची, अडीअडचणींची, आपल्या जिवाची पर्वा न करता समाजासाठी अहोरात्र झटणार्या आमच्या सर्व पोलिस बांधवांना सर्मपित केलेले हे पुस्तक पोलिसांची दुसरी बाजू सांगते. जगाचे स्वरूप सातत्याने बदलते आहे. जागतिकीकरण, उदारीकरण व खासगीकरणामुळे जीवनाची व्याख्याच पार बदलून टाकली आहे. आधुनिक जीवनाने आयुष्य सुखद झाले तरी समाजात नकारात्मक, अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आधुनिक सोई-सुविधांनी गुन्हेगारीलाही खतपाणी घालण्याचे नव्हे, तर गुन्हेगारीचा महावृक्ष करण्याचे काम...
  December 21, 05:28 AM
 • काही वर्षांपूर्वी पुण्यात भरलेल्या उद्योजकीय साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणात थोर साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांनी मराठी माणसाच्या विदारक स्थितीचे वर्णन मायभूमीतच दुय्यम नागरिक ठरलेला या शब्दांत केले होते. आजही आजूबाजूला जरा नजर टाकली तर ते वर्णन किती योग्य आहे, याचा प्रत्यय आपल्याला येतो. उद्योग, व्यापार, सेवा या सर्वच क्षेत्रांत मराठी माणसाची सतत पिछेहाट होत असून त्यामुळे महाराष्ट्रातील मोठय़ा शहरामध्ये नाही तर छोट्या गावांमध्येही आर्थिक व्यवहाराच्या नाड्या अमराठी...
  December 21, 05:25 AM
 • नाटक या विषयाला हे संमेलन या वेळी वाहिलेले होते. नाशिकच्या प्रायोगिक रंगभूमीबद्दल बराच ऊहापोह होत असताना या विषयावरील संमेलन अनेकांसाठी नवे काही देणारे ठरले यात शंका नाही. पण, या संमेलनात अध्यक्षाऐवजी बीजभाषण असल्याने ज्येष्ठ नाटककार गो. पु. देशपांडे यांना आमंत्रित केले होते. त्यांनी युरोपात जशी कादंबरी आधुनिकतावादाची जनक ठरली तसेच काम नाटकाने इथे केले या विधानापासून नाटकाचा विष्णुदास भाव्यांपासून घेतलेला धांडोळा आणि त्यातून काढलेले निष्कर्ष हे विचार करावयास लावणारे होते. अर्थात...
  December 21, 05:20 AM
 • नाटकाला सुरुवात झाली. एकेक पद रंगत गेलं. गंधर्वांचं लडिवाळ रूप, त्यातली सोज्ज्वळता. रसिकांना जाणवलं, या माणसावर आपण राग धरूच शकत नाही. हा कसा किर्लोस्कर फोडेल? इतका साधा, ऋजुता असलेला हा चेहरा... याच्या आड कसलं कपट असणार. त्यातच त्यांचा तो मधाळ आवाज. गंधर्वांच्या रूपानं आणि निरांजनाप्रमाणे भासणा-या सात्त्विक सौंदर्यानं लोकांची मनं जिंकून घेतली. बोडस, टेंबे, नरूभाऊ, विसूभाऊ सर्वासर्वांची कामं रंगत गेली. सगळीच अभिनय-संगीतातली खणखणीत नाणी. त्यांच्या खणखणाटात नव्या कंपनीबद्दलची रसिकांची...
  December 7, 12:16 AM
 • अन्न अन् निवा-याच्या मूलभूत गरजांपलीकडे जाऊन समूह, संस्कृती आणि नीतिमूल्यांचा विचार माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरवतो. या विचार मंथनातून नवनिर्मितीच्या व्यापक हेतूने आयोजित करण्यात येणा-या संमेलनांकडून माणसांऐवजी विचारांना स्थान मिळावे, अशी साहित्यप्रेमींची रास्त अपेक्षा असते; पण या संमेलनांकडून नकळत समन्वय साधण्याऐवजी भाषिक संघर्ष उभारला जात असेल तर संमेलनाचे फलित काय? असे काही प्रश्न नाशिकमध्ये 3 व 4 डिसेंबर रोजी झालेल्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाने मागे सोडले...
  December 7, 12:11 AM
 • माझी मातृभाषा राजस्थानी. फक्त शालेय शिक्षणच झालेले आहे; परंतु मला वाचनाची आवड असल्यामुळे व सतत काही ना काही वाचत राहिल्यामुळे भाषेची अडचण जाणवत नाही. तरी कधी-कधी काही चुका होतातच. जसे वाचता येऊ लागले तसे हळूहळू बालसाहित्याच्या माध्यमातून वाचन सुरू झाले. उत्तरोत्तर ते वाढत गेले. मी आजपर्यंत प्रेमचंद, रवींद्रनाथ टागोर, व. पु. काळे, शिवाजी सावंत, शरदचंद्र, बंकीमचंद्र, इरावती कर्वे, किशोर काळे यांचे कोल्हाट्याचे पोर वाचले तसेच विश्वास पाटलांच्या गाजलेल्या कलाकृती, महात्मा गांधींवरील पुस्तके...
  December 7, 12:07 AM
 • अक्षरधाराच्या पुस्तक प्रदर्शनाच्या उपक्रमामुळे वाचकांना प्रथमच लेखक थेट भेटू लागले तसेच त्यांचे मार्गदर्शन लाभू लागले. रमेश तेंडुलकरांनी अक्षरधाराच्या दुस-या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन केले होते. 13 ऑक्टोबर 1994 रोजी डोंबिवलीत सुरू झालेल्या या ग्रंथप्रदर्शन चळवळीने आता चांगलेच बाळसे धरले असून त्यांचा व्याप आता एका युनिटवरून तीन युनिटपर्यंत वाढला असून साधारणत: 30 कर्मचा-यांचा वर्ग आजत्यांच्याकडे आहे. आज एकाचवेळेस त्यांची महाराष्ट्रात तीन-तीन प्रदर्शने व एका फिरत्या वाहनातून...
  December 7, 12:02 AM
 • सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ या संशोधनपर ग्रंथाची भैरू रतन दमाणी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. याच ग्रंथाला याआधी राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे, त्यानिमित्ताने त्यांचे मनोगत...माझ्या साहित्यकृतीला पुरस्कार मिळाला यापेक्षा वैचारिक लिखाण वाचण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे, ही माझ्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. 1860 ते 1920 हा न्या. काशीनाथ तेलंग, न्या. महादेव रानडे आणि न्या. नारायण चंदावरकर यांचा सलग असा कार्यकाल. समाजात उदारमतवादी...
  November 30, 12:39 AM
 
जाहिरात

RECOMMENDED