Home >> Magazine >> Akshara

Akshara

 • एरवी महाराष्ट्र साहित्य परिषदेत काय घडते हे कळतही नाही तर मसापच्या अनेक शाखा ढिम्म अाहेत हे नवीन नाही. त्यामुळेच मसापचे विविध उपक्रम विविध शाखांचे पदाधिकारी अाणि साहित्य रसिकांपर्यंत पाेहाेचावे यासाठी अाता मसाप चांगलीच साेशल मीडिया सॅव्ही हाेत अाहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे. मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम ही संस्था गेली ११० वर्षे निष्ठेने करीत आहे. परिषदेला लोकाभिमुख करण्यासाठी मसापला...
  December 23, 03:16 AM
 • अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघाच्या पुढाकाराने तिसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन पुणेयेथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात रविवारी (दि. २५) सकाळी १० ते रात्री ८ वाजेदरम्यान होत आहे. या संमेलनात डॉ. विजय खरे यांच्या स्वागतपर भाषणानंतर उद्घाटन सत्रात संमेलनाचे बीजभाषण आयसीएसएसआर, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात करणार आहेत. संमेलनाचे निमंत्रक डॉ. विजय खरे, परशुराम वाडेकर, डॉ. मिलिंद कसबे व डॉ. रोहिदास जाधव हे असून उद्घाटन सत्राचे अध्यक्ष कामगार नेते...
  December 23, 03:13 AM
 • गेल्या काही वर्षांपासून जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या चरित्र लेखनाची परंपरा चालू अाहे. चरित्र लेखन करणाऱ्या लेखकाला प्रत्येक नवीन चरित्र हे या परंपरेला अाणखी पुढे नेऊन जीवनभर ते काम करऱ्यासाठी प्रेरित करते. लिअाेनार्डाे द विंची, डार्विन, एडिसन, अल्फ्रेड नाेबेल अाणि अाइन्स्टाइनसारखे चरित्र लिहिणारे विनाेदकुमार मिश्र यांनी नाेबल विजेती शास्त्रज्ञ मादाम क्यूरी हे चरित्र लिहून चरित्र लेखनाचा अापला संकल्प अाणखी बळकट केल्याचे दिसून येते. अापल्या संशाेधनातून या जगाला प्रत्यक्ष...
  December 23, 03:03 AM
 • साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा लेखिका - कवयित्री डाॅ. माधवी वैद्य यांच्या गुंफिरा या अाॅडिअाे बुकचे नुकतेच पुण्यात सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन झाले. वैद्य यांच्याच अावाजात असलेल्या या कथासंग्रहात अापण एेकता-एेकता एकरूप हाेताे. त्याला साथ अाहे ती संगीताची. या संगीतामुळेच अापण या कथांमध्ये समरसून जाताे. बुकहंगामा डाॅट काॅमवर हे बुक उपलब्ध अाहे. या पुस्तकाबद्दल विक्रम भागवत यांनी लिहिलेले काही शब्द... पुस्तकाचे शीर्षक लक्षवेधी असले तरी गुंफिरा...
  December 16, 03:41 AM
 • साहित्य संमेलनाला लाेकं येणार का? संमेलन नक्की काेणासाठी अाणि का? मग मराठी साहित्यरसिक त्यातही तरुणांनी संमेलनाकडे वळावे यासाठी काेणी, कसे प्रयत्न केले पाहिजे... असे अनेक विषय संमेलन सुरू हाेण्यापूर्वी चर्चेत असतात. यावर मात्र डाेंबिवलीत हाेणाऱ्या ९०व्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षांनीच ताेडगा काढत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांचा एक दाैराच ठरवून टाकला. या दाैऱ्यात अध्यक्ष ठिकठिकाणी सभा घेऊन लाेकांना संमेलनप्रक्रिया अाणि संमेलन कशासाठी असते हे सांगणार...
  December 16, 03:18 AM
 • लैंगिक शाेषणासाठी मानवी व्यापार करणाऱ्या लष्करी कंत्राटदाराच्या विराेधात लेखिकेचा न्यायासाठी लढा म्हणजेच द व्हिस्टलबाॅलर अर्थात एकाकी लढा हे पुस्तक. नेब्रास्कातील पाेलिस अधिकारी अाणि मुलांची घटस्फाेटित माता कॅथरिन बाेल्काेव्हॅक खासगी लष्करी कंत्राटदार डीनकाॅर्प इंटरनॅशनल या कंपनीची नाेकरभरतीची जाहिरात बघते, अर्ज करते अाणि भरती हाेते. चांगली कमाई, जगभर प्रवास अाणि युद्धामुळे छिन्न-भिन्न झालेल्या देशाची पुनर्बांधणी करण्याची कामगिरी म्हणजे तिच्यासाठी उत्कृष्ट संधी असते....
  December 16, 03:01 AM
 • विनायकराव माणूसवेल्हाळ तर आहेतच; माणसात राहणारे, रमणारे, माणसांना जपणारे, जाणणारे आहेत आणि हा त्यांचा स्थायिभाव, सहज स्वभावधर्म आहे. राजकीय क्षेत्र, कृषिक्षेत्र, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्र अशा कितीतरी क्षेत्रांमध्ये त्यांनी गेली पाच तपे भरीव योगदान दिले आहे. सांस्कृतिक क्षेत्राबद्दल म्हणायचे झाले, तर विनायकराव नाशिकचे अनभिषिक्त सांस्कृतिकमंत्री म्हणूनच ओळखले जातात. या प्रत्येक क्षेत्रात त्यांना आलेले अनुभव आणि त्यांचे स्वत:चे विचारमंथन यातून एक समृद्ध संचित त्यांच्यापाशी जमा...
  December 16, 03:00 AM
 • नाेकरीपेक्षा उद्याेग-धंदा बरा असे म्हटले जाते. किंबहुना अनेकजण तसा प्रयत्नही करतात अाणि फसतात. विविध कारणांनी ते अयशस्वी हाेतात. त्यांना अापल्या उद्याेग-धंद्यामध्ये यश मिळावे म्हणून एक मार्गदर्शक पुस्तक म्हणजेच प्रा. जीवन मुळे यांचे मी यशस्वी उद्याेजक हाेणारच...! जागतिकीकरण अाणि उद्याेगांचे बदलते स्वरूप पाहता तरुणाईचा एकंदर अाेढा उद्याेगशील झाला अाहे. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मिळणाऱ्या गलेलठ्ठ पगाराच्या नाेकऱ्या साेडून मुलं अापला स्वत:चा स्टार्टअप सुरू करताना दिसत अाहेत. अशा नवीन...
  December 16, 01:06 AM
 • महाराष्ट्र शासनाच्या साहित्य अाणि सांस्कृतिक मंडळाच्या अर्थसाह्याने हाेणारे भटक्या विमुक्तांचे १० राज्यस्तरीय साहित्य संमेलन १४ अाणि १५ जानेवारी राेजी नाशिक येथे हाेत अाहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद काेंडाजी अाव्हाड यांच्याकडे तर संमेलनाध्यक्षपदी बालसाहित्यिक सुभाषचंद्र वैष्णव यांची निवड करण्यात अाली अाहे. नाशिक येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक महाविद्यालयात हाेणाऱ्या या संमेलनात कविसंमेलन, ग्रंथदिंडी, परिसंवाद, प्रकट मुलाखत, सांस्कृतिक कार्यक्रम, संमेलनात मांडायचे...
  December 9, 03:30 AM
 • अारक्षण असलेल्या समाजातील गाेरगरीब अाजही अाहे तिथेच अाहेत अाणि अारक्षण मिळालेल्याच प्रत्येक कुटुंबातील इतरजण पुन्हा-पुन्हा ते अाेरबाडून घेत अाहेत. एकाच कुटुंबामध्ये लाभ मिळत असल्याने त्याच-त्याच कुटुंबातील सदस्य गब्बर हाेऊन चालले अाहेत. अारक्षणातून सक्षम झालेली कुटुंबे वगळली की अार्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सवर्ण समाजातील घटकालादेखील अारक्षणाचा लाभ मिळणे शक्य हाेणार अाहे. अशी परखड मते ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शेषराव माेरे यांनी दिव्य मराठीच्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये...
  December 9, 03:06 AM
 • स्वातंत्र्योत्तर काळातील पंजाबी कवितेतील महत्त्वाचे नाव म्हणजे कवी सुरजित पातर. पंजाबचा अस्वस्थ वर्तमान सुरजित पातर यांच्या कवितांमधून व्यक्त होताना दिसतो. पातर यांची कविता पुरेशी आत्मनिष्ठ जशी आहे, तशीच ती पंजाबच्या भोवतालाशी, सामाजिकतेशीही जोडलेली आहे. पंजाबी जनतेमध्ये पातर यांच्या कवितांना जिव्हाळ्याचे स्थान आहे. त्यांची कविता साहित्यमूल्य म्हणून श्रेष्ठ तर आहेच, पण तिला लोकप्रियतेची झळाळीही लाभली आहे. पुण्यात नुकतेच पहिले विश्व पंजाबी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचे...
  December 2, 03:00 AM
 • संवादाचा विषय - मी पण लेखक सहभाग: सावी शर्मा, दिव्यप्रकाश दुबे, एल. पी. पंत, किंजल शहा, अनुज खरे , अानंद नीलकंठन लेखक बनण्याचे प्रत्येकाचे निमित्त भिन्न असले, तरी लिहायला प्रवृत्त झाल्याची प्रेरणा एकसमान हाेती. त्या प्रेरणेमागील रहस्य उलगडताना सावी शर्मा, दिव्यप्रकाश दुबे, एल. पी. पंत, अानंद नीलकंठन या नवलेखकांनी त्यांच्या लेखनाचा प्रवासच उलगडून दाखवला. सपनोंके मर जाने का डर, सबसे खतरनाक हाेता है या दाेन अाेळींमधून प्रत्येकाने व्यक्त हाेणे का अावश्यक अाहे, त्याचा कानमंत्रच दिला....
  November 25, 03:00 AM
 • सार्वजनिक वाचनालय नाशिक म्हणजेच बाेलताना सर्वजण सावाना असे सुटसुटीत म्हणतात. त्या सावानाचा जिल्हा साहित्यिक मेळावा म्हणजेच एक हवाहवासा, अापलेपणा वाटणारा कार्यक्रम, उत्सवच म्हणायला हवा. सावानाचे वय १७६ वर्षे. मेळाव्याचे वय ४९. शतकाेत्तर सुवर्णमहाेत्सव साजरा करणार अाहे, हे विशेष. अखंड ४९ वर्षे अाणि ठरावीक वेळेस असा उत्सव साजरा करणे हे नक्कीच काैतुकाचे. १९६८ सालची गाेष्ट. ज्येेष्ठ विनाेदी लेखक डाॅ. अ. वा. वर्टींच्या मनात ही कल्पना अाली. त्यांनी अापल्या साहित्यप्रेमी मित्रांना ती बाेलून...
  October 9, 06:47 AM
 • जगाच्या पाठीवर आज अनिवासी मराठी (एनआरएम) माणसांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी बहुतेकदा त्यांची चर्चा केवळ उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने होते. परंतु, आपल्या संस्कृतीचे, साहित्याचे रोपणदेखील ही मंडळी ठिकठिकाणी करत असतात. विविध देशांमध्ये महाराष्ट्र मंडळासारख्या संस्था निर्माण झाल्या असल्या तरी त्यांचे उद्दिष्ट तसे मर्यादित आहे. त्यापुढचे एक पाऊल म्हणूनअनिवासी भारतीयांमध्ये निर्मळ संवाद प्रस्थापित व्हावा, या दृष्टिकोनातून विश्व पांथस्थ मासिकाचा उपक्रम सुरू करण्यात आला असून,...
  October 9, 06:46 AM
 • कवीचे व्यक्तिमत्त्व हे सर्वसाधारण मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा वेगळे असते. त्यामुळे प्रकृतीही सर्वसाधारण मनुष्यापेक्षा वेगळीच असते. मर्ढेकरांच्या मते सामान्य जनांचे आंतरिक व्यक्तिमत्तव योगायोगानुसारी असते, तर लेखक किंवा कवीचे व्यक्तिमत्त्व - त्यांच्या मनातील आंतरिक साच्याची व्यवस्था - विशिष्ट तत्त्वानुसारी असते. याचा अर्थ असा की, सर्वसाधारण मनुष्याचे व्यक्तिमत्त्व आणि कवी-कलावंताचे व्यक्तिमत्त्व या दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये असणारे वेगळेपण कलात्मक निर्मितीच्या...
  September 16, 01:28 AM
 • साहित्य हा समाजाचा आरसा असते. साहित्यिकया विविध कलांचा अथांग पाईक असतो. साहित्य ही कला असते. त्यातुन नवनिर्मिती करणं. सौंदर्य निर्माण करणं. नवविचार मांडणं. नवतत्व शोधून काढणं. त्यातुन मानवी जगण्याला अधिक बळकट करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य साहित्यिक करत असतो. साहित्यात प्रत्येकाला जगावसं वाटतयं. तसा प्रयत्नही केला जातो. साहित्याला तसं वय, वेळ, भाषा, काळ, मुळीच नसतो. परंतु, निर्मिती करणाऱ्या साहित्यिकास ही बंधन असतात. प्रत्येक क्षेत्रात जसं लहान मोठेपण असतं, तसं साहित्य क्षेत्रातही असतं....
  September 16, 01:21 AM
 • आपले आयुष्य हीच कवितेची पार्श्वभूमी असते. कवितेच्याही आवाक्यात येणार नाही इतके अफाट, अथांग, व्यामिश्र, बहुआयामी, नैकरेषीय, अनाकलनीय आणि परस्पर अंतर्विरोधांचे अस्तित्व आयुष्यात आहे. मी कविता का लिहितो? या प्रश्नावर विचार केला तर माझ्या लक्षात येते की काहीतरी सांगण्याची मुलभूत ओढ माझ्यात आहे. स्वतःचे मन हलके व्हावे अशी एक सुप्त इच्छा कविता लिखाणाच्या मागे असावी, असे माझे प्रामाणिक मत आहे. काहीतरी सांगण्याची प्रक्रिया तर इतर गद्य लिखाणातूनही होऊ शकते. मग कविताच का? मला असे वाटते की भाषेचा...
  September 16, 01:19 AM
 • पंजाबमधील घुमान या ऐतिहासिक ठिकाणी गेल्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले, त्या निमित्ताने पंजाब आणि महाराष्ट्र यांच्यातील ऐतिहासिक नात्याला पुन्हा उजाळा मिळाला. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पातळ्यांवरही हे नाते नव्याने बळकट करावे, असा विचारही या संमेलनाच्या व्यासपीठावरून मांडला गेला. राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळही या विचाराला मिळाले आणि घुमान संमेलनाच्या आयोजनात पुढाकार घेणाऱ्या सरहद संस्थेने पहिले विश्व पंजाबी साहित्य संमेलन पुण्यात आयोजित करण्याचे ठरवले. त्यानुसार...
  August 26, 05:15 AM
 • ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड येथे माेठ्या दिमाखात पार पडल्यानंतर अाता ९०वे साहित्य संमेलन कुठे हाेणार याची उत्सुकता साहित्य विश्वात अाहे. याचा निर्णय १८ सप्टेंबर २०१६ राेजी पुण्यात हाेणाऱ्या बैठकीत घेतला जाणार असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाद जाेशी यांनी सांगितले. सुरुवातील साहित्य संमेलनासाठी केवळ कल्याणचे निमंत्रण अाले हाेते. त्यामुळे संमेलनाच्या स्थळासाठी टांगती तलवार हाेती. त्यावेळी साहित्य महामंडळाचे कार्यालय...
  August 26, 05:14 AM
 • कविता म्हटलं की अनेकांच्या कपाळावर अाठ्या येतात, कवी दिसला की तिथून पळच काढला जाताे असे म्हणतात पण एकिकडे ही स्थिती असताना दुसरीकडे तब्बल एक हजार ते बाराशे कवी एकाच छताखाली येतात अाणि अखंड ७६ तास काव्यहाेत्र तेवत ठेवतात तेव्हा नक्कीच कवितेला स्वत:चे अस्तित्त्व असल्याचे सिद्ध हाेते.गाेवा कला अकादमी अाणि गाेवा सरकारच्या वतीने हे काव्यहाेत्र गेल्या दाेन वर्षांपासून सुरू अाहे. गेल्या वर्षी ५२ तास तर यंदा तब्बल ७६ तास अखंड काव्यवाचानाचा प्रवाह सुरू ठेवत पूर्वीच्या ७० तास काव्यवाचनाचा...
  August 5, 05:18 AM
 
जाहिरात

RECOMMENDED