Home >> Magazine >> Akshara

Akshara

 • पुस्तकाची दुनिया अफाट आहेच. कितीही वाचायचे ठरवले तरीही आयुष्य पुरणार नाही. दुसरा जन्म काही माणसाचा मिळणार नाही. म्हणूनच वयाची साठी ओलांडल्यानंतर आता निवडकच वाचायचे असे ठरवले. आतापर्यंत जे जे हातात पडत गेले ते वाचत गेलो. या वाचनाने आयुष्य समृद्ध झाले. पुस्तक हा माझा श्वास आणि ध्यास असला तरी यापुढे मात्र आवडणारी पुस्तके संग्रही ठेवण्याचा विचार करतो आहे. बुक्स आॅन बुक्स हा माझा आवडीचा प्रांत. या पुस्तकांचा परिचयही वाचकांना करून देणार आहे. मध्यंतरी विष्णू जयवंत बोरकर यांचे मौज...
  November 30, 12:37 AM
 • गेल्या दशकात पालकांचा कल आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये शिकवण्याकडे वाढला आहे. याचे फायदे-तोटे किती हा मुद्दा येथे आपल्याला चर्चेत घ्यावयाचा नाही. मात्र, इंग्रजी माध्यमातील शिक्षणामुळे मुलांचा मातृभाषेतील संपर्क हळूहळू तुटत चालला आहे. अर्थात अनेक घरांमध्ये मातृभाषा बोलली जात असल्याने ती भाषा केवळ बोली भाषा म्हणूनच वापरली जाते. अशा स्थितीत शालेय शिक्षकांकडून मुलांना मातृभाषेतील संपर्क तुटू नये साठी मातृभाषेतील पुस्तके वाचण्यास सांगितले जाते. तसेच काही...
  November 30, 12:34 AM
 • नारायण हरी आपटे यांचा हा गाजलेला कथासंग्रह. थोडीशी गूढता निर्माण करणा-या व अद्भुतरम्य असलेल्या या कथा एका वेगळ्या धाटणीच्या वाटतात. 'इत्र का दाग'मधील 'नामर्द का बच्चा' आणि 'आपण एकशे पाच'मधील एकी निर्माण करू पाहणा-या राजपुतांच्या करणदेवाला आपले बलिदान द्यावे लागते. एकूण वेगवेगळ्या भावनांवर, माणसाच्या प्रकृतीवर प्रकाश टाकणा-या या कथा आहेत. 'पुत्रादिच्छेत्पराजयम', 'म्हातारा आला न गेला' , 'वडिलांचे चिरंजीव', 'जावई आणि घरजावई', 'न हसणारा तरुण पाहिजे' इ. कथा आहेत. छोट्या आशयघन कथा म्हणजे एकापरीने 'गागर...
  November 23, 09:30 AM
 • स्टीव्ह जॉब्स : एक झपाटलेला तंत्रज्ञ माहिती तंत्रज्ञानातील जगातील सर्वात प्रसिद्ध जादुगार स्टीव्ह जॉब्सचे निधन होऊन आता दीड महिना झाला; पण त्याच्या नावाची जादू वाचकांवर त्याच्या चाहत्यांवर अजूनही कायम आहे. विशेषत: औरंगाबादेत त्याच्यावरील कोणतेही पुस्तक आले तर हातोहात संपते, असा विक्रेत्याचा अनुभव आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकतेच प्रसिद्ध केलेले 'स्टीव्ह जॉब्ज : एक झपाटलेला तंत्रज्ञ' ला गेल्या आठवड्यात चांगली मागणी राहिली. स्टीव्हने आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेले...
  November 23, 09:25 AM
 • एखादी कथा आपल्याला सिंहिणीच्या तावडीत सापडवते, तर एखादी कथा आपल्याला बर्लिनची भिंत ओलांडण्यासाठी कराव्या लागणा-या अचाट साहसाचे दर्शन घडवते. म्हणजे आपण एका क्षणी आफ्रिकेच्या घनदाट जंगलात असतो, तर दुस-याच क्षणी जर्मनीत असतो. हे कल्पनाविश्व आपल्याला एक वेगळाच थरार देऊन जाते. ज्याला ज्याला म्हणून वाचायची आवड आहे तो एखादे तरी रहस्यकथांचे पुस्तक निवडतो. लहानांपासून थोरांपर्यंत रहस्यकथा आवडणारे अनेक वाचक आहेत. त्यामुळे रहस्यकथांची पुस्तके विशेष लोकप्रिय ठरतात.'मृत्युपेटीत पाच दिवस' हे...
  November 23, 09:18 AM
 • औरंगाबाद- दत्तात्रय गायकवाड औरंगाबाद येथील जिल्हा कृषी कार्यालयात कृषी अधीक्षक आहेत. त्यांना शालेय जीवनापासूनच पुस्तक वाचनाची आवड आहे. मुरूम सारख्या ग्रामीण भागात पुस्तक वाचनाचा फारसा प्रसार झालेला नसतानाही वाचनालयात गेल्याने त्यांना वाचनाची गोडी निर्माण झाली. आपल्या पुस्तक वाचनाच्या आवडीबाबत सांगताना ते म्हणाले, मी उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम या गावचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीतच त्यांच्या नावाचे महाराष्ट्रातील पहिले वाचनालय माझ्या गावात होते. मला लहान...
  November 23, 09:13 AM
 • औरंगाबाद- मुस्लिम मराठी साहित्य परंपरा ही या मुस्लिम मराठी संतकवींपासून असली तरी मुस्लिम मराठी साहित्याचे (आधुनिक) आद्य प्रवर्तक म्हणून 1905 मध्ये सांगली येथे जन्मलेल्या सय्यद अमीन यांचे नाव घेता येईल.मराठी साहित्याचा प्राचीन -मध्ययुगीन काळ म्हणून इ.स. 1050 ते 1850 हा कालावधी गणला जातो. याच कालखंडातील जवळजवळ 50 मुस्लिम मराठी संतकवींनी मराठी साहित्यात भर घातली आहे. मुस्लिम मराठी संतकवींपैकी काही निवडक संतांची पुस्तके, लिखाण उपलब्ध आहे; पण इतरांची पुस्तके, त्यांची माहिती किंवा चरित्र अशी साधने...
  November 23, 09:08 AM
 • नाशिक- पुस्तकांचा दर्शनी चेहरा, दर्शनी ओळख म्हणजे मुखपृष्ठ. या मुखपृष्ठाचे सध्याचे बाजारातले मूल्य इतके वाढले आहे की वाचक ब-याचदा मुखपृष्ठ पाहूनच पुस्तक विकत घेतो वा मुखपृष्ठावरूनच पुस्तकाची किंमत आपल्या खिशाला परवडेल की नाही हे ठरवत असतो. पुस्तकाचा हा मेकअप जितका आकर्षक तितका वाचकाला तो खेचणारा असतो. ही बाब आता सर्वच भाषांमधील पुस्तक प्रकाशकांनी मान्य केली आहे. मराठीतील साहित्यदेखील त्याला अपवाद नाही. सध्याची मराठी पुस्तके पाहता मुखपृष्ठांचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. तसेच...
  November 23, 09:04 AM
 • सुरेश भटांनी आपल्या सप्तरंग या साहित्यकृतीत गौरवकुमारांचा जाणीवपूर्वक गौरव केल्याने त्यांनी अतिशय जबाबदारीने... मी मराठी माणसांच्या चालतो न्यायालयीकाळजाच्या स्पंदनांची मांडतो फिर्याद मीअशी फिर्याद मांडली आहे. अतिशय तंत्रशुद्ध आणि पुरेपूर तयारीने आलेल्या या गझलसंग्रहात आयुष्य जगताना आलेल्या बयावाईट अनुभवांच्या चित्रणासह गझलेतील विद्रोही स्वर संयमाने आणि परिपक्वतेने आला आहे. विशेषत: भुजंगप्रयात, आनंदकंद, स्त्रग्विणी, इयेनिका अशा विविध वृत्तांमध्ये असलेल्या गझला वाचकांचे लक्ष...
  November 16, 04:05 AM
 • आधी स्वामी रजनीशनंतर भगवान रजनीश व शेवटी ओशो या नावाने ओळखल्या जाणा-या या आधुनिक संताचे विचार त्यांच्या काळापेक्षा खूप प्रगत आहेत. त्यांचा जन्म कदाचित एक शतक आधी झाल्यामुळे असे असावे; पण त्यांचे जहाल तत्त्वज्ञान तत्कालीन लोकांच्या पचनी पडले नाही. लोकांनी त्यांच्या ख-या रूपाला, त्यांच्या महिमेला समजूनच घेतले नाही. आज मात्र त्यांचे तत्त्वज्ञान, योगा समजून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात दिसते आहे. योग एक विज्ञान आहे. ते काही धर्मशास्त्र नाही. हिंदू-मुस्लिम, जैन किंवा...
  November 16, 04:02 AM
 • सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अनुराधा पाटील यांचे शिक्षण पहूर (ता. जामनेर) येथे एस.एस.सी.पर्यंत झाले. त्यांच्या कवितेने स्वत:ची स्वतंत्र वाट शोधत, समकालीन मराठी कवितेच्या क्षेत्रात प्रभाव निर्माण करणा-या प्रतिभासंपन्न कवयित्री म्हणून स्थान निर्माण केलेय. स्त्रियांच्या जीवनातील दु:खाला, एकाकीपणाला, सोशिकतेला उद्गार देणारी त्यांची कविता स्वत:च्या सशक्त शैलीत व्यक्त होत, स्वत:ची मुद्रा निर्माण करते. त्यांच्या कवितेची पोत स्वतंत्र, स्वयंभू आहे. काळ्या कातळाच्या छातीत घुसमटणा-या...
  November 16, 03:57 AM
 • मला आपल्या मातृभाषेतील म्हणजे मराठी पुस्तकेच वाचण्यास आवडतात. शालेय जीवनापासून वाचनाची आवड आजपर्यंत जपलेली आहे, असे डॉ. श्रीराम जाधव यांनी सांगितले. ते येथील देवगिरी महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख तसेच म. गांधी अध्ययन केंद्राचे संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या विचारसरणींचा त्यांच्यावर प्रभाव आहे. ते म्हणाले : अण्णासाहेब सहस्रबुद्धे या गांधीवादी विचारसरणीच्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाने लिहिलेले माझी घडण या पुस्तकाने माझ्या आयुष्यावर खूप...
  November 8, 10:01 PM
 • जागतिकीकरणाचा, खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करूनही आता सुमारे पंधरा वर्षांचा काळ लोटला आहे. आपली दारे खुली केल्यावर जीवनाच्या विविध क्षेत्रात आधुनिकतेचे जे वारे किंवा झंझावात घुसले आहेत आणि त्यांनी जी उलथापालथ आपल्या जीवनात घडवून आणली आहे, ती आश्चर्यकारक आहे. त्याचे एक प्रतिबिंब क्रॉसवर्डसारख्या पुस्तक दालनांत पडलेले दिसते आहे. मॉलसदृश बाह्यदर्शन, उंची काचांची सजावट, संपूर्ण वातानुकूलित जागा, एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखे इंटेरिअर, आकर्षक पद्धतीने मांडलेली बुक शेल्व्हज, मंद...
  November 8, 10:00 PM
 • दुष्काळाच्या छायेतील जामखेड आणि आष्टी परिसरात असलेलं भाळवणी हे अप्पांचं जन्मगाव. जन्म साधारण 1936 चा. मधुकर गहिनीनाथ कोरपे हे त्यांचं पूर्ण नाव. घरात अठराविश्वे दारिद्र्य. बापाच्या तुटपुंज्या मजुरीवर कुटुंब चालायचं. खाणारी पाच तोंडं. कधी गुरे वळण्याचं, कधी भुसार दुकान चालवण्याचं काम करून अप्पा नगरला येऊन हमाली करू लागले. लिहिता-वाचता न येणारे अप्पा धडाडी व प्रामाणिकपणाच्या जोरावर पुढे हमालांचे नेते बनले. महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी डॉ. बाबा...
  November 8, 09:59 PM
 • आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्यक्ष भेटीगाठी, ख्याली-खुशाली, शुभेच्छा या सा-या गोष्टींसाठी फेसबुक सारखी सोशल मीडियाची माध्यमे प्रत्येकांचे सखेसोबती झाले आहेत. मग याच सारख्या अत्याधुनिक माध्यमांचा उपयोग करून जर पुस्तकासारखी अनमोल भेटवस्तू अगदी तुम्ही जगाच्या कानाकोप-यात कोठेही असा जर ती तुमच्या वाढदिवसाला वा अगदी पाहिजे त्या दिवशी... सवलतीच्या दरात... थेट घरपोच आणि तेही वर्षभर मिळाली तर.. तुम्ही म्हणाल कसे शक्य आहे. हो. तुम्ही फक्त मराठीदालन.कॉम संकेतस्थळावर जायचे आणि आपल्या पसंतीच्या...
  November 8, 09:58 PM
 • स्त्रियांनी रचलेल्या या ओव्या म्हणजे एका पिढीने दुसर्या पिढीशी साधलेला संवाद असे. आता जाते राहिलेलेच नाही. मिक्सरचा जमाना आलेला आहे; पण एका पिढीने दुसर्या पिढीला दिलेला वारसा अक्षय- अभंग रूपाने अक्षरबद्ध होऊन राहिलेला आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरातील आई आपल्या मुलीला अनुभवांचे बोल सांगून सावध करत असते. समाज आणि पुरुष कसा आहे हे तिला या शब्दांत सांगावे वाटले- पराया पुरुषाला, बोलू नये एकाएकी, अग माझी सईबाई, आपुन अशिलाच्या लेकी, पराया पुरुषाला देऊ नये कात-चुना, अग माझी सई, आपुन अशिलाच्या...
  November 5, 01:58 PM
 • बंगाली साहित्यात असाच अत्यंत लोकप्रिय झालेल्या शरदिन्दू बंद्योपाध्याय यांचा व्योमकेश बक्षी हा मानसपुत्र प्रथमच मराठी भाषेत उपलब्ध झाला आहे. व्योमकेश बक्षी रहस्यकथा या नावाने तीन भागांत या मानसपुत्राचे कारनामे रोहन प्रकाशनच्या प्रदीप चंपानेरकर यांनी प्रकाशित केले आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक अशोक जैन यांनी व्योमकेश बक्षीच्या रहस्यकथांचा मराठीत अनुवाद केला आहे. एकूण अकरा रहस्यकथांचा या तीन भागांत समावेश आहे. मूळ बंगाली भाषेतील या रहस्यकथा र्शीजाता गुहा यांनी इंग्रजीत...
  November 5, 01:53 PM
 • प्रसिद्ध सिंचनतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. वसंत गोवारीकर आणि डॉ. माधव गाडगीळ हे ते चार वेगळ्या वाटांनी जाणारे आनंदयात्री. अशा थोरा-मोठय़ांची चरित्रे नेहमीच प्रेरणादायक असतात. चारही चरित्रांचे लेखक अ. पां. देशपांडे आहेत. डॉ. अनिल काकोडकरांच्या चरित्राचे डॉ. र्शीराम मनोहर यांनीही संपादन केले आहे. डॉ. सदानंद बोरसे यांनी म्हटल्याप्रमाणे- अनेक वाटा धुंडाळणारे, त्या वाटांवर दीप पेटवणारे, मळलेली वाट सोडून नवा प्रकाश दाखवणारे हे चौघे आनंदयात्री आहेत. अशा प्रवाशांना लोक चक्रम...
  November 5, 01:49 PM
 • महाराष्ट्रातून सुमारे 400 ते 500 दिवाळी अंक निघतात. दोन वर्षांपूर्वीच दिवाळी अंक या साहित्यप्रकाराने शतकपूर्ती गाठली आणि व्हच्यरुअल जमान्यात या अंकांना अजूनही भरीव स्थान आहे हे सिद्ध झाले. या साहित्यविश्वात नवे काय, हा प्रश्न नवी पिढी हमखास विचारत राहते आणि याचे उत्तर यंदा बर्याच दिवाळी अंकांनी देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. सर्वप्रथम मानाने उदाहरण घ्यावेसे वाटते ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संवेदन या अंकाचे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने आज 108 वे वर्ष चालू असताना...
  November 5, 01:45 PM
 
जाहिरात

RECOMMENDED